खा. सुनील तटकरे यांची ‘कोरोना’वर मात

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन –   राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी कोरोनावर मात केली आहे. आज (2 नोव्हेंबर) त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णलयातून (Breach Candy Hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची मुलगी आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Sunil Tatkare) यांनी याबाबत माहिती दिली आहे. एका वृत्तपत्रासोबत त्या बोलत होत्या.

27 ऑक्टोबर रोजी सुनील तटकरे यांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली होती. त्यांचा कोरोना (Covid-19) टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. सुनील तटकरे यांची प्रकृती उत्तम होती परंतु खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

7 दिवसांच्या उपचारानंतर तटकरे यांनी कोरोनावर मात केली आहे. आज दुपारी त्यांची कोरोना टेस्ट करण्या आली. ही टेस्ट निगेटीव्ह आली आहे. यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.