राष्ट्रवादी सोडणारे हे भरड्या पीठासारखे : रोहित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला राज्यात केवळ ४ जागा मिळाल्या. त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादीची पॉवर कमी झाल्याचे म्हणण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेना-भाजपची वाट धरली. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली. विरोधकांना किंवा समर्थकांना कोणावरही टीका करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमीच वेगळ्या पद्धतीने टीका करतात. आता त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी वेगळ्या पद्धीने पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर टीका केली आहे.

शरद पवार पक्षाच बदल करताना नेहमी भाकरी फिरवणे या शब्दाचा वापर करत असतात. याच शब्दाचा वापर रोहित यांनीही केला आहे. एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं, अशा शब्दांत रोहित पवार यांनी टीका केली आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे.

पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर टीका करताना रोहीत यांनी चांगलीच पोस्ट लिहीली आहे. संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असं लावलं जातं आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. हे त्यांना देखील माहित आहे.

त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आलं नसतं, असंही त्यांनी सांगितलं. तसंही पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतील देखील पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं, असा टोमणा ही त्यांनी यावेळी मारला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –