मुंबई महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग, रोहित पवारांकडे धुरा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई महानगरपालिका निवडणूक दीड वर्षे दूर असली तरी आतापासूनच सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. भाजपने तर नागरी समस्या सोडवण्यासाठी सेवासेतू उपक्रम सुरु केला आहे. तर दुसरीकडे सर्वात आधी कमला लागलेल्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर मार्च महिन्यातच पदाधिकारी मेळावा घेत आपले मनसुबे स्पष्ट केले. मुंबईत आपले संघटन कमकुवत असल्याची जाणीव असलेल्या पक्ष नेतृत्वाने त्याची कसर राज्यातील सत्तेच्या जोरावर भरून काढण्याचाच जणू चंग बांधला आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी सुरु केलेल्या भेटी गाठी कार्यक्रम, मेळावा याला लॉकडाऊनमुळे ब्रेक लागला. मलिक यांनी मार्च महिन्यात घेतलेल्या मेळाव्यावर अजित पवारांची छाप होती. मात्र आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडे पालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. पक्षतील गटबाजी सर्वज्ञात आहे त्यामुळे मलिकानी सुरु केलेली गाडी शह-काटशहाच्या राजकारणात तर रुतणार नाही ना, अशी शंका आता पक्षातूनच व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादीची ताकद वाढायला हवी अशी भूमिका त्यांनी कार्यकर्त्यासमोर मंडळी होती. वेळोवेळी त्याचा पुनुरुच्चार हि त्यांनी केला होता. मात्र, राष्ट्रवादीला गटातटाच्या राजकारणातून बाहेर येता आले नाही. एकेकाळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले सचिन अहिर निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दाखल झाले. तर, संजय दिना पाटील यांनी आपले तळ्यातमळ्यात असतानाही नवाब मलिक यांच्याशी भिडायला मागेपुढे पाहिले नव्हते. तर, उत्तर मुंबईत एकहाती राष्ट्रवादीचा झेंडा नेणारे प्रकाश सुर्वे यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत दुसऱ्यांदा आमदारकीही मिळवली. विविध पक्षांतून आलेल्या नेत्यांची मांदियाळी म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी, असे चित्र आहे.

आपापल्या भागात, क्षेत्रात वर्चस्व असणाऱ्या या नेत्यांना पक्ष म्हणून कधीच एकत्रित छाप टाकता आली नाही. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकप्रिय कामे हाती घेतली जातील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून पक्षाचा जनाधार वाढविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने चालविला आहे.

सर्वात मोठा पक्ष बनविण्याचे लक्ष्य कष्टप्रदच
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद आहे. मंत्रिपद आणि अध्यक्षपदाचा योग्य वापर करण्याचा धोरणाला कितपत पाठिंबा मिळतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल. मलिक यांनी मेळावा घेत धडाक्यात केलेली सुरुवात लाॅकडाऊनमुळे थांबवावी लागली. मेळाव्यावर अजित पवारांची छाप होती. त्यातच आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडे पालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे शह-काटशहाच्या राजकारणात पक्ष्याच्या लक्ष्याला ब्रेक लग्नांर कि काय अशी शंका आता पक्षातूनच व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जेमतेम ९ नगरसेवक असणाऱ्या राष्ट्रवादीला मुंबईत सर्वात मोठा पक्ष बनविण्याचे लक्ष्य आजच्या घडीला तर कष्टप्रदच मानले जात आहे.