NCP | राष्ट्रवादीने भाजपाला दिला सूचक इशारा, खेळलेला डाव कधीही त्यांच्यावर उलटला जाऊ शकतो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP | शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील (Shinde Group) धनुष्यबाण चिन्हावरून (Dhanushyaban Symbol) सुरू असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे चिन्ह तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने केवळ शिवसेनाच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिंदे गटाने चिन्ह गोठवण्याची केलेली मागणी आयोगाने मान्य केल्याने शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, शिवसेनेचा महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने (NCP) या प्रकरणात भाजपाला (BJP) सूचक इशारा दिला आहे.

 

कागदपत्रांच्या आधारे आयोगाने तात्पुरते दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींमागे भाजपा असल्याचा आरोप सातत्याने शिवसेना आणि इतर पक्ष करत आहेत. आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी भाजपाला सूचक इशारा देताना म्हटले आहे की, भाजपाचे ’ऑपरेशन लोटस’ नव्हे, हे तर ’ऑपरेशन डिवाईड अँड रूल’ होते. इंग्रजांची पॉलिसी वापरून एक हौशी मोहरा वापरला आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना व धनुष्य बाण गोठवले. पण भाजपने हे लक्षात ठेवावे, त्यांनी खेळलेला हा डाव कधी त्यांच्यावर देखील उलटला जाऊ शकतो. (NCP)

 

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी रात्रभर झोपलो नाही. देवा हे काय केलंस तू? यांचा बंदोबस्त कर देवा. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली ते संपणार आहेत. निवडणूक आयोग यंत्रणा केंद्राच्या हातात आहे. हा लोकशाहीचा खून आहे. अंधेरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जिंकून येणारच. साधा रिक्षावाल्याने कोट्यवधी रुपये छापले. उद्धव ठाकरेंनी केवळ हात वर केला. याचे परिणाम भयानक होतील. भाजपा कुठेही दिसणार नाही. एकनाथ शिंदे संपणार आहे, असे खैरे म्हणाले.

निवडणूक आयोगाने चिन्हाबाबत आदेश देताना म्हटले आहे की, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले असल्याने शिवसेना आणि
शिंदे गटाला अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East By-Election) दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायापैकी त्यांना हवे ते वेगवेगळे चिन्ह मिळेल.
त्यासाठी शिवसेना व शिंदे गटाने चिन्हांचेही तीन पर्याय पसंतीक्रमानुसार आयोगाला सोमवारी दुपारपर्यंत द्यायचे आहेत.
त्याचा निर्णयही सोमवारी आयोग घेईल.

 

नावाबाबत आयोगाने म्हटले की, शिवसेना आणि शिंदे गटाची जर इच्छा असेल
तर शिवसेना हे नाव वापरून त्यापुढे स्वत:च्या गटाचे नाव जोडून ते वापरण्यास आयोगाने हरकत घेतलेली नाही.
त्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपल्याला कोणत्या नावाने ओळखले जावे याचे
तीन पर्याय पसंतीक्रमानुसार निवडणूक आयोगासमोर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सादर करावे लागतील,
त्यावर निवडणूक आयोग निर्णय देईल.

 

Web Title :- NCP | the innings played may be reversed upon them at any time ncps warning to bjp over shivsena symbol Maharashtra Political News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

T-20 World Cup | भारताला आणखी एक धक्का! ‘हा’ मध्यमगती गोलंदाज दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

MS Dhoni | धोनीचा मेणाचा पुतळा बनवणाऱ्यावर चाहत्यांकडून संताप

IND vs SA 2nd ODI | द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत ‘हा’ खेळाडू घेणार दीपक चहरची जागा