‘राष्ट्रवादी’ने PM मोदींचा ‘तो’ व्हिडिओ केला ‘ट्विट’, फडणवीसांना ‘टोला’ ! (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळी अधिवेशनात भाजपकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपवर पलटवार करत पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ शेअर केला आहे, त्यावरुन टीका करण्यात आली की मोदींच्या अपेक्षेला भाजप नेते काळीमा फासत आहेत.

विधीमंडळाच्या अधिवेशन आज कुस्तीच्या आखाड्यात बदलल्यासारखे वाटले. त्याला कारणं ही तसेच आहे. शिवसेना भाजपच्या आमदारात आत विधीमंडळाच हमरीतुमरी झाली. एवढ्यावर भागले नाही तर शिवसेनेचे बुलडाण्यातील आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांत थेट हाणामारी झाली.

भाजपच्या या भूमिकेची राष्ट्रवादीने आठवण करुन दिली. या ट्वीटमध्ये म्हणले की एकीकडे पंतप्रधान मोदी संसदीय राजकारणात वेलमध्ये न उतरल्याबद्दल एनसीपीचं कौतुक करतात आणि राज्यातील हे बाशिंदे मोदींच्या अपेक्षेला काळीमा फासतात. राज्यात विरोधी पक्ष म्हणून भाजप सदस्यांनी विधीमंडळाच्या उच्च परंपरांची अवहेलना चालवली आहे अशी खोचक टीका राष्ट्रवादीकडून भाजपवर करण्यात आली.

केंद्राकडे पैसे मागा
शेतकऱ्यांच्या बाबत विरोधी पक्षांकडून ज्या प्रकारे सरकारवर टीका करण्यात येत आहे त्याला देखील मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की येथं शेतकऱ्यांसाठी गळा काढण्यापेक्षा केंद्राकडे गळा काढा. केंद्रात विरोधी पक्षांचे सरकार आहे. केंद्रातून राज्याला मिळणारा जीएसटीचा परतावा जवळपास 15 हजार कोटी रुपये आहे. केंद्राकडे चार पाच राज्यांनी मागणी केल्यावर आता केंद्राने पहिला हफ्ता साडेचार हजार कोटी रुपये दिला आहे. शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावे करा, राज्य सरकारच्या नावे करु नका.

या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की प्रश्न मांडायचे असतील तर ही पद्धत नाही. बोंबलून प्रश्न मांडता येत नाहीत. सरकार बदल्यानंतर जनतेच्या मनात आनंद आहे. आशा पल्लवित झाल्या आहेत. त्या खुरडण्याचा प्रयत्न करु नका. मुख्यमंत्री म्हणून जनतेला न्याय देण्याचे काम मी करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/