CAA – NRC : ‘महाविकास’मधील कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘जेव्हा तुमचा बाप…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी यावरुन देशातील अनेक राज्यांत निदर्शने होत आहेत. या कायद्याविरोधात विरोधी पक्ष केंद्र सरकारला सतत धारेवर धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की इतकी वर्षे देशात राहिल्यानंतर लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सांगितले जात आहे, जे की चुकीचे आहे. या बाबतीत राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘मी दिल्लीच्या तख्ताला विचारु इच्छितो, तुम्ही आमच्याकडे देशातील नागरिक असल्याचे पुरावे मागणार का? मग ऐका, जेव्हा तुमचा बाप मान खाली करुन इंग्रजांचे पाय चाटत होता. तेव्हा आमचा बाप फाशीच्या दोरीचं चुंबन घेत इन्कलाब जिंदाबादचे नारे देत होता.’ राष्ट्रवादी आधीपासूनच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करत आहे.

त्याचबरोबर एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीसह देशातील अनेक राज्यांत निदर्शने होत आहेत. शेकडो महिला एका महिन्यापासून दिल्लीच्या शाहीन बागेत धरणा देऊन बसल्या आहेत आणि सरकारकडून नागरिकता दुरुस्ती कायदा मागे घ्यावा अशी मागणी करत आहेत. त्याचबरोबर शाहीन बागच्या निदर्शनाबरोबरच लखनौ आणि पाटणा येथील निदर्शने देखील जोर धरू लागली आहेत. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष या कायद्याला विरोध करीत आहेत.

या विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, एनआरसी मुळे एक समुदायाची नागरिकता धोक्यात आली आहे. तथापि, सरकारचे म्हणणे आहे की नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील धार्मिक अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यात येईल, ज्याचा देशाच्या कोणत्याही नागरिकाशी काही संबंध नाही. सरकारने एनआरसीवर म्हटले आहे की अद्याप असा कोणताही प्रस्ताव आला नाही. सध्याला सीएएचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –