नेपाळमध्ये आता ‘हिंदी’वर बंदी घालण्याची तयारी, जाणून घ्या किती लोकप्रिय आहे तिथं ही भाषा

नवी दिल्ली : नेपाळचा भारतविरोधी सूर सध्या वाढतच चालला आहे. नव्या राजकीय नकाशात उत्तराखंडातील तीन भाग आपले असल्याचे सांगितल्यानंतर पीएम केपी शर्मा ओली यांनी भारतीय सुनांसाठी नागरिकत्व नियमांमध्ये बदल करण्याचे सूतोवाच केले होते. आता ओली यांनी संसदेत हिंदीवर बंदी आणण्याबाबत प्रस्ताव मांडला आहे. पीएमच्या या प्रस्तावाकडे जहाल राष्ट्रवाद म्हणून पाहिले जात आहे. देशात कोरोनाची स्थिती बिकट असल्याने लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पीएम असे करत असल्याचे बोलले जात आहे.

संसदेत प्रस्ताव सादर करताच पंतप्रधानांच्या पक्षाच्याच लोकांनी त्यांना विरोध दर्शवला आहे. याचे कारण हे आहे की, नेपाळची मोठी लोकसंख्या हिंदीमध्येच बोलते. विशेषकरून तराईमध्ये राहणारे लोक हिंदी, भोजपुरी किंवा मैथिलीमध्ये बोलतात. जाणून घ्या स्वताला हिंदू राष्ट्र म्हणवणार्‍या नेपाळमध्ये काय आहे हिंदीची स्थिती…

हजारो लोक बोलतात हिंदी

नेपाळच्या तराई परिसरात राहणारे लोक हिंदीत बोलतात. ही बाब 2011 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या जनगणनेत समोर आली. भारताच्या सीमेलगत असणार्‍या भागात राहणार्‍या लोकांची एकुण संख्या 77,569 आहे. म्हणजे नेपाळची ही सुमारे 0.29 टक्के लोकसंख्या आहे. याशिवाय नेपाळच्या आतील भागात सुद्धा मोठ्या संख्येने लोक हिंदीत बोलतात आणि हिंदीच समजतात. भारत-नेपाळमधील चांगले संबंध आणि दोन्ही देशात जाणे-येणे सोपे असल्यामुळे ही स्थिती आहे. आणखी एक कारण म्हणजे बॉलीवुड सिनेमा हे सुद्धा आहे. नेपाळमध्ये भारतीय चित्रपट जास्त लोकप्रिय आहेत.

यापूर्वीही हिंदीवरून वाद

एकीकडे येथे हिंदी लोकप्रिय आहे तर दुसरीकडे यावरून वाद सुद्धा होत आले आहेत. येथील माजी उप राष्ट्रपती परमानन्द झा यांनी 2008 मध्ये शपथग्रहण सोहळ्यात हिंदीत शपथ घेतली होती, तेव्हा खुप गोंधळ उडाला होता. नेपाळच्या रस्त्यावर विरोधीपक्षाने निदर्शने केली होती, आणि मागणी केली होती की, नेत्यांनी नेपाळी भाषेत शपथ घ्यावी. अनेक दिवस ही निदर्शने सुरू होती आणि त्यांचे पुतळे जाळले जात होते. हा विरोध पाहून नेपाळच्या कोर्टाने निर्णय दिला की, हिंदीमधील शपथेला मान्यता दिली जाणार नाही. हे 2009 मध्ये घडले होते. पुढील वर्षी सुरूवातीला परमानंद झा यांना पुन्हा नेपाळीमध्ये आणि आपल्या मातृभाषेत मैथिलीमध्ये शपथ घ्यावी लागली होती. तेव्हा वाद संपुष्टात आला.

2015 मध्ये दुसर्‍यांदा या उप राष्ट्रपतींनी मागणी केली की, हिंदीला युनायटेड नेशन्सच्या 6 अधिकृत भाषांमधील एका भाषेचा दर्जा मिळावा. सध्या इंग्रजी, अरेबिक, चायनीज, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश भाषांना इंटरनॅशनल भाषांची मान्यता मिळाली आहे.

नेपाळी राजकीय नेत्यांचा हिंदीसाठी पुढाकार

नेपाळचे साहित्यिक आणि चारवेळा पीएम असलेले लोकेन्द्र बहादुर चन्द यांनी सुद्धा हिंदीला नेपाळमध्ये वाढवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांचेही मत होते की, हिंदी नेपाळमध्ये मोठ्याप्रमाणात बोलली आणि समजली जाते. दोन्ही भाषांमध्ये खुप समानता आहे. यासाठी भाषेला प्रोत्साहन देण्यात यावे. हिंदीसह नेपाळी भाषेची स्क्रिप्टसुद्धा देवनागरी आहे. म्हणजे दोन्ही भाषा एका पद्धतीनेच लिहिल्या जातात.

येथे दुसर्‍या भारतीय भाषासुद्धा आहेत

नेपाळची पहिली भाषा नेपाळी आहे. ती सुमारे 44.64% लोकसंख्या बोलते. दूसर्‍या नंबरवर मैथिली भाषा आहे. ती 11.67% लोक बोलतात, तर भारताच्या युपी आणि बिहारमध्ये बोलली जाणारी भोजपुरी भाषासुद्धा येथे 6 टक्के लोकांची पहिली भाषा आहे. येथे दहाव्या नंबरवर आहे उर्दू, जी जवळपास हिंदीशी मिळती-जुळती आहे. सुमारे 2.61% लोक ती बोलतात.

अशाप्रकारे नेपाळची एकुण लोकसंख्या म्हणजे 10,883,804 लोकांपैकी 1,225,950 लोकांची हिंदी पहिली भाषा मानतात. अशा स्थितीत हिंदीवर प्रतिबंध लावण्याचे ओली यांचे मत हे लोकांचे लक्ष्य विचलित करण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. स्वता संसदेत खासदार सरिता गिरी यांनी यास विरोध केला. त्या म्हणाल्या, असे केल्याने सरकारला तराई आणि मधेशियांच्या मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागेल. हे लोक हिंदी भाषा बोलातात आणि दुसर्‍या भारतीय भाषासुद्धा त्यांच्या परिसरात बोलल्या जातात. जसे की मैथिली आणि भोजपुरी.