नीरा येथील युवकाचा वीजेचा धक्का लागून मृत्यू

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन – नीरा येथील युवकाचा घराच्या टेरेसवर फिरत असताना टेरेसवरून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा धक्का लागून मृत्यू  झाला. इब्राहिम इस्माईल शेख (वय-३२) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची फिर्याद अन्वर सादिक शेख यांनी नीरा पोलिस दुरक्षेत्रात दिली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नीरा येथील वार्ड नं.३ मध्ये राहत असलेले इब्राहिम इस्माईल शेख (वय-३२) हे नेहमी प्रमाणे शनिवारी (दि.२३) सकाळी सव्वा दहा वाजता आपल्या घराच्या टेरेसवर गेले होते. परंतू  त्यांचा  ओरडण्याचा जोरात आवाज आल्याने त्यांच्या घरातील लोकांनी टेरेसवर धाव घेतली असता त्यांना टेरेसवरून लगतच्या जाणाऱ्या वीज वाहिणीचा धक्का लागला असल्याचे समजते. त्यानंतर त्यांना नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर इब्राहिम इस्माईल शेख यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी महावितरणाच्या गलथान कारभाराची चौकशी करावी. व महावितरणच्या वरिष्ठांनी या घटनेची वीज तपासणी निरीक्षकांकडून पाहणी करावी अशी  मागणी स्थानिक नागरिक  करीत आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुरेश गायकवाड करीत आहेत.

Visit : Policenama.com