‘तो’ निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित नव्हता, देवेंद्र फडणवीसांचा मोठा ‘खुलासा’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फडणवीसानी आपले मत व्यक्त केले आहे ते म्हटले की, ‘अजित पवार यांच्या सोबतीने भाजपाने स्थापन केलेल्या सरकारविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायलयात दाखल केलेल्या याचिकेचा निकाल आमच्या विरोधात जाईल असं वाटलं नव्हतं,’ असं मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवारांनी तुमची साथ सोडली का?

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवारांनी तुमची साथ सोडली का? असे फडणवीसांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “त्या निकालामुळे अजित पवारांनी माघार घेतली का हे अजित पवारच सांगू शकतील,” तसेच “विधानसभेचे नियम हे संविधानाच्या अंतर्गत बनलेले नियम आहेत. त्यामुळे ते संविधानाने आणि घटनेने आखून दिलेले नियम आहेत.

म्हणूनच रुल्स ऑफ बिझनेस म्हणजेच कार्यभार संभाळण्याच्या नियमांप्रमाणे कारभार सुरु ठेवा असा निकाल येईल असं आम्हाला अपेक्षित होता. जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तो आम्हाला अपेक्षित नव्हता. पण ठिकं आहे, न्यायलयाने जो निकाल दिला तो आम्ही मान्य केला,” असे देखील त्यांनी स्पष्ट केले असून सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आम्हाला अपेक्षित नव्हता असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

सरकार स्थापनेनंतर अजित पवारांनी भाजपाची साथ का सोडली?

सरकार स्थापनेनंतर असे काय झाले की, अजित पवार यांनी भाजपाची साथ सोडली असा देखील प्रश्न फडणवीसांना करण्यात आला त्यावर फडणवीस म्हणाले, “खरं तर अजित पवारांनी न्यायलयाच्या निकालामुळे साथ सोडली का याचं उत्तर तेच तुम्हाला देऊ शकतील. पण माझ्या काही वैयक्तीक कारणांमुळे मला आता तुमच्यासोबत राहता येत नाही असं त्यांनी मला कळवलं. या कारणांमुळेच मी परत जातोय असं त्यांनी मला सांगितलं होतं,” असा खुलासा फडणवीसांनी केला असून “अजित पवारांबरोबरच्या सत्तास्थापनेसंदर्भात पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्या आहेत आणि त्या योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन,” असे देखील त्यांनी सांगितले.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून अजित पवार यांना सोबत घेऊन स्थापन केलेलं सरकार घटनाबाह्य असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. त्यानंतर २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी न्यायलयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर २६ नोव्हेंबरला बहुमत चाचणी घेण्यात यावी असा निर्णय दिला होता. तसेच बहुमत चाचणी गुप्त पद्धतीने न घेता मतदानाचे सर्व व्हिडिओ रेकॉर्डींग करावे असे न्यायायलयाने स्पष्ट केले होते.

दरम्यान लगेचच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन बहुमत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. एकंदरीतच या संपूर्ण सत्तानाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

Visit : Policenama.com