पुणे जिल्हा : ‘हे’ आहेत 12 तालुक्यातील पंचायत समित्यांचे नवे ‘कारभारी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील तेरापैकी सर्वाधिक सात पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम राखले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादीचा बोलबाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन पंचायत समित्या मिळाल्या आहेत. शिवसेना आणि काँग्रेसने आपापल्या प्रत्येकी दोन पंचायत समित्यांवरील सत्ता कायम राखली आहे. मात्र, काँग्रेसची इंदापूरची पंचायत समिती ही भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील समर्थकांच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळे या पंचायत समितीवर केवळ तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसची सत्ता असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला हवेली पंचायत समितीची सत्ता गमवावी लागली आहे. ही पंचायत समिती भाजपच्या ताब्यात गेली आहे. पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचे नवे सभापती व उपसभापतींच्या निवडी आज (मंगळवार) करण्यात आल्या. नव्याने निवड करण्यात आलेल्या कारभाऱ्यांना अडीच वर्षांऐवजी सव्वादोन वर्षाचाच कार्य़काळ मिळणार आहे.

पंचायत मितीनिहाय नवे कारभारी पुढीलप्रमाणे कंसात पक्ष
बारामती – नीता बारवकर, प्रदीप धापटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
भोर – श्रीधर केंद्रे, दमयंती जाधव (राष्ट्रवादी काँग्रस)
मुळशी – पांडुरंग ओझरकर, विजय केदारी (राष्ट्रवादी काँग्रेस)
दौंड – आशा शितोळे, नितीन दोरगे (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिरुर – मोनिका हरगुडे, सविता पऱ्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस)
आंबेगाव- संजय गवारी, संतोष भोर (राष्ट्रवादी काँग्रेस)
इंदापूर – पुष्पा रेडके, संजय देहाडे (काँग्रेस)
वेल्हे – दिनकर सरपाले, सीमा राऊत (काँग्रेस)
जुन्नर – विशाल तांबे (राष्ट्रवादी काँग्रेस), रमेश खुडे (शिवसेना)
पुरंदर – नलिनी लोळे, गोरक्षनाथ माने (शिवसेना)
हवेली – फुलाबाई कदम (भाजप), युगंधर काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस)
मावळ – निकिता घोटकुले (भाजप), दत्तात्रेय शेवाळे (राष्ट्रवादी काँग्रेस)

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/