Delhi Riots: योजनाबद्ध होती दिल्लीतील ‘दंगल’, नगरसेवक ‘ताहिर हुसेन’ आणि ‘उमर खालिद’ यांनी रचले होते ‘षडयंत्र’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   सीएए आणि एनआरसीविरूद्ध ईशान्य दिल्लीत झालेल्या भयंकर दंगलीच्या वेळी झालेल्या जातीय हिंसाचाराच्या घटना या नियोजनबद्ध होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे दिल्लीत येताच देशद्रोहाचा आरोप असलेले जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद यांनी समुदायांच्या लोकांची भेट घेऊन कट रचला आणि दंगली घडवून आणण्यास सुरूवात केली.

चांदबागमध्ये झालेल्या दंगलीच्या एक दिवस अगोदर त्याने आम आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासमवेत बैठक घेऊन कट रचला होता. ताहिरने एक दिवस अगोदर खजूरी खास पोलिस ठाण्यात जमा असलेली आपली परवानाधारक पिस्तूल देखील आणली होती, त्या पिस्तुलाचा वापर त्याने दंगलीमध्ये केला होता. उमर खालिद आणि ताहिर हुसेन हे या दंगलीचे मुख्य सूत्रधार होते.

ईशान्य दिल्लीतील फेब्रुवारीतील दंगलीच्या दोन प्रकरणांमध्ये गुन्हे शाखेने मंगळवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात वरील बाबींचा उल्लेख केला आहे. दंगली दरम्यान 53 लोक ठार झाले होते. या 53 घटनांसह अन्य सहा प्रकरणांच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेत तीन एसआयटी स्थापन करण्यात आल्या. त्यापैकी दोन प्रकरणात करकरडूमा (Karkardooma) कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले गेले. हवालदार दीपक दहियावर दंगलीच्या वेळी गोळीबार करणाऱ्या ड्रग तस्करी करणाऱ्या शाहरुख पठाण प्रकरणात गुन्हे शाखेने यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे.

प्रथम प्रकरण

जाफराबाद दंगल 25 फेब्रुवारीला क्रिसेंट पब्लिक स्कूलच्या बाहेर आणि जाफराबाद मेट्रो स्टेशन जवळ प्रचंड दंगल झाली. दंगलीच्या वेळी अमन नावाच्या तरूणाला गोळी घालून ठार मारण्यात आले. पोलिसांना घटनास्थळावरून 35 काडतुसांचे रिकामे खोके सापडले. ज्यात 7.65 मिमीचे 11 खोके, 8 मिमीचे 7 काडतुसे आणि 5.56 मिमीचे 17 खोके होते. या प्रकरणात आतापर्यंत 12 लोकांना अटक करण्यात आली आहे.

दुसरे प्रकरण

ताहिर हुसेन प्रकरण खजूरी खास पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी ताहिर हुसेनच्या घराबाहेर भीषण दंगल झाल्याचे आरोपपत्रात सांगण्यात आले आहे. या प्रकरणात ताहिर हुसेनसह 15 जणांना अटक करण्यात आली आहे. येथील दंगलीत ताहिर हुसेन याचा हात होता. या प्रकरणात त्याचा धाकटा भाऊ शाह आलम यालाही अटक करण्यात आली आहे.

दंगलीत वापरण्यात आलेली ताहिर हुसेनची परवाना पिस्तुल जप्त केली आहे. दंगलीच्या एक दिवस आधी 22 फेब्रुवारी रोजी ताहिरने खजूरी खास पोलिस ठाण्याकडून पिस्तूल परत घेतली होती. विधानसभा निवडणुकीत त्याने पिस्तूल जमा केली होती. दंगल होण्यापूर्वी ताहिरची खालिद सैफी आणि उमर खालिद यांच्याशी बैठक झाली होती. हे दोघेही त्या लोकांच्या एका मोठ्या गटाचा एक भाग होते जे दिल्लीत दंगल आणि निषेध करत होते. ताहिर हुसेन याच्या घराच्या छतावर विटा, दगड, काचेच्या बाटल्या ज्यात अ‍ॅसिड भरलेले होते. छतावरुन आणखी काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्या ज्यामुळे या भागात दंगल भडकवण्याच्या कटात ताहिर हुसेनचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like