Coronavirus : 2400 विदेशी जमातींना ‘हे’ 40 प्रश्न विचारणार क्राईम ब्रँच, क्वारंटाईन केंद्रात सुरू झाली विचारपूस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसबाबत देशात संकट उभे करणारे तबलिगी मरकज प्रकरणात विदेशी नागरिक ज्यांचा क्वारंटाइन कालावधी संपला आहे, त्यांची तेथेच गुन्हे शाखेने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. जमातमध्ये सामील झालेल्या 2400 विदेशी नागरिकांची आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी ओळख पटवली असून मरकज प्रकरण तपासात पोलिसांना या परदेशी नागरिकांची माहिती मिळाली आहे. मरकजमध्ये सामील असलेले सर्व परदेशी नागरिक आरोपी असतील, असे दिल्ली पोलिसांनी आधीच स्पष्ट केले आहे.

मुख्यालयातील सूत्रांच्या माहितीनुसार गुन्हे शाखेला परदेशी नागरिकांची माहिती मिळाली असून त्यांच्या विरोधात लुक आऊट परिपत्रक (एलओसी) जारी करण्यात आले आहे. पोलिसांनी सुमारे १५०० हून अधिक परदेशी लोकांना पकडून १५ क्वारंटाइन केंद्रामध्ये ठेवले आहे. येथे जे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, त्यांना रुग्णालयात भरती केले गेले, हे रुग्ण दिल्लीतील आठ वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत.

त्याचबरोबर जमातमध्ये सामील झालेल्या सुमारे ९०० परदेशी लोकांची माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३-१५ मार्च दरम्यान मरकज मध्ये झालेल्या विशेष आयोजनानंतर मौलाना मुहम्मद साद आणि व्यवस्थापनाशी संबंधित इतर ६ मौलानांनी त्यांना इस्लाम शिकवण्यासाठी भारताच्या विविध राज्यांत पाठवले आहे. हे लोक कोणत्या राज्यांमध्ये लपले आहेत याची माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. या लोकांना देशभरातील मशिदी आणि मदरशांमध्ये शोधले जात आहे, जेणेकरून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जाऊ शकेल.

४० प्रश्नांची यादी तयार
विदेशी जमातींच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेने सुमारे ४० प्रश्नांची यादी तयार केली असून यात ते कोणत्या देशाचे आहेत? कोणाच्या सांगण्यावरून ते दिल्लीला आले होते, सादने त्यांना आमंत्रण पाठवले होते का? मरकजमध्ये पैशांची मागणी केली गेली किंवा त्यांनी स्वत: दान केले, किती पैसे दिले? त्याची पावती दिली होती का? दिल्लीत त्यांना कोठे थांबवले होते? जगात कोरोनाचा प्रसार होण्याविषयी त्यांना माहिती आहे की नाही? माहित होते तर मरकज मध्ये इतक्या मोठ्या संख्येने ते का सामील झाले? इत्यादी अनेक प्रश्न आहेत.

क्राइम ब्रांचची आहे ही योजना
कोरोना संकटात विदेशी जमात ठेवण्याचा प्रश्नही पोलिसांसमोर असून अशा वेळी क्राइम ब्रांच क्वारंटाइन केंद्रातच निवेदन नोंदवत आहेत. सध्या सर्वांची विधाने नोंदवून थेट न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची पोलिसांची योजना असून यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल. या लोकांनी आपल्या देशातून पळून जाऊ नये म्हणून त्यांच्याविरोधात एलओसी जारी करण्यात आले आहे. या लोकांवर व्हिजा नियमांचे उल्लंघन केल्याचा देखील आरोप आहे. याशिवाय टुरिस्ट व्हिजावर येऊन धार्मिक प्रचार केल्याचादेखील आरोप असून अशा ट्रायल किंवा अटकेचा निर्णय न्यायालयच घेईल.