माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. छातित दुखत असल्याने त्यांना रविवारी (दि.10) रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांना कार्डिओ थोरॅसिक वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु आहे. असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.


माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रविवारी सायंकाळी छातीत दूखत असल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले. 87 वर्षीय डॉ. मनमोहन सिंग यांना हृदयाशी संबंधी विकार आहेत. रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.