भाजपकडून नवीन चेहऱ्याला संधी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे या चर्चेला सुरुवात झाली आहे . विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना डावलून नवीन कोणता चेहरा भाजप देणार का ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

वडगांव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार जगदीश मुळीक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनिल शिरोळे हे खासदार आहेत. नवीन चेहरा देताना वेगळाच निकष लावला जाऊ शकतो. मुळीक आणि मोहोळ हे दोघेही मराठा समाजाचे आहेत. शिरोळे हे देखील मराठाच असुन त्यांना डावलून दुसऱ्या समाजामधील उमेदवार देणे योग्य ठरणार नाही असे मतही वरीष्ठ नेत्यांचे आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम सर्व पक्षांत वाजू लागले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे नुकतेच पुण्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून गेले. यानंतरच पुण्यातील उमेदवारी यासंदर्भात चर्चा रंगू लागली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून नवीन चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मुळीक आणि मोहोळ यांची नावे पुढे आली. यापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट आणि शिरोळे यांच्यात उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा होती. परंतु आता नवीन चेहरा आणि तरुण उमेदवार देण्याकडे भाजप नेत्यांचा कल आहे. आमदार मुळीक हे प्रथमच निवडून आले आहेत. त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली आणि ते आमदार झाले. तर मोहळ यांनी वार्ड अध्यक्ष, शहर कार्यकारणी, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष आदी पदांवर काम केले आहे. तसेच तीन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना दोन वेळा त्यांनी महापालिकेचे अंदाजपत्रकही मांडले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे संघटनात्मक आणि लोकप्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव जास्त असल्याने त्यांचे नाव अग्रेसर असल्याचे समजते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us