खुशखबर ! जुनं फ्रीज, वॉशिंग मशिन आणि AC सरकारला विका, मिळवा जास्त रक्कम आणि फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – मोदी सरकार लवकरच जुन्या गाड्या, एयर कंडीशनर, वॉशिंग मशीन आणि फ्रिज संदर्भात नवीन पॉलिसी बनवणार आहे. पुढील आठवड्यात सरकार स्टील स्क्रॅप पॉलिसी बनवणार आहे. या पॉलिसीचा ड्राफ्ट तयार करण्यात आला असून यामध्ये केवळ गाड्याच नाही तर एयर कंडीशनर, वॉशिंग मशीन आणि फ्रिजचा देखील समावेश करण्यात आला आहे. या नवीन पॉलिसी अंतर्गत विविध ठिकाणी स्क्रॅप सेंटर उघडण्यात येणार असून नागरिक या ठिकाणी आपल्या जुन्या वस्तू विक्री करू शकणार आहेत.

पॉलिसी आणण्याचा उद्देश
या भंगार विक्रीवर सरकार इन्सेन्टिव्ह देखील देणार आहे. तुम्ही जितक्या किमतीचे भंगार विकणार, तितकेच पैसे सरकार देखील तुम्हाला देणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी भंगार विकणे हे सरकारचा यामागील उद्देश आहे.

नवीन गाड्यांची विक्री वाढण्याची शक्यता
या नवीन पॉलिसीमुळे नागरिक जुन्या गाड्या भंगारामध्ये विकून नागरिक नवीन गाड्या घेण्याची देखील शक्यता वाढणार आहे. यामुळे नवीन गाड्यांची विक्री देखील वाढणार आहे. काही कंपन्यांनी गाड्यांच्या किमतीमध्ये कपात देखील केली आहे.

स्टील सेक्टरला देखील होणार फायदा
या पॉलिसीमुळे स्टीलची आयात कमी होणार असून जमा केलेल्या स्टीलवर प्रक्रिया करून सरकार नवीन स्टील बनवणार आहे. भारतात दरवर्षी 60 लाख टन स्टील स्क्रॅप आयात केले जाते. यामुळे स्टील कंपन्यांचा देखील मोठा फायदा होणार आहे.

Visit : policenama.com

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या