मित्राच्या भेटीसाठी नवनिर्वाचित आमदारानं ठेवलं ‘चार्टर्ड’ विमान खोळंबून !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोणालाच बहुमत न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडून आलेल्यांना सध्या चांगलाच भाव आला. त्याशिवाय त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ लागली आहे. त्यासाठी या नवनिर्वादित आमदारांना मुंबईला आणण्यासाठी चार्टर्ड फ्लाईटही तयार ठेवण्यात आली होती. पण, २०१४ मध्ये पराभूत झाल्यानंतरही ज्यांनी ५ वर्षे मदतीचा हात दिला, त्यांची भेट घेण्यासाठी त्यांनी चक्क दीड तास चार्टड फ्लाईट खोळंबून ठेवले होते. आशिष जयस्वाल असे या आगळ्या वेगळ्या आमदाराचे नाव आहे. त्यांचे जीवलग मित्र आहेत, भाजपाने ज्यांना तिकीट नाकारले ते चंद्रशेखर बावनकुळे.

आशिष जयस्वाल हे कट्टर शिवसैनिक आहेत. युती नसताना ते थोड्या मतांनी पराभूत झाले. तेथे भाजपाने ही जागा जिंकली होती. शिवसेनेबरोबरच्या सेटिंगमध्ये ही जागा भाजपाच्या वाट्याला गेली.

आशिष जयस्वाल यांनी पराभवानंतरही गेली ५ वर्षे मतदारसंघात झटून काम केले. त्यासाठी नागपूरचे पालकमंत्री आणि त्यांचे जीवलग मित्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना भरपूर विकास निधी देऊ केला. त्यातून त्यांनी मतदारसंघातील गावांमधील शेतीपर्यंत जाणारे विक्रमी पांणद रस्ते बांधले. युतीत त्यांना तिकीट नाकारल्यावर काँग्रेसने तातडीने त्यांना ऑफर दिली. पण हाडाचा शिवसैनिक असलेल्या जयस्वाल यांनी ही ऑफर नाकारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी मेसेज पाठविला. ‘‘आता आमदार म्हणूनच मुंबईत येईन आणि हरलो तर मुंबईचे तोंड पाहणार नाही”.

मतदारांच्या आर्शिवादाने ते तब्बल २४ हजार मतांनी जिंकले. आशिष जयस्वाल हे विजयी झाल्याचे समजताच त्यांच्याशी थेट मातोश्रीवरुन संपर्क साधण्यात आला. त्यांना मुंबईला घेऊन येण्यासाठी चॉर्टर्ड फ्लाईट तातडीने पाठविण्यात आले. शिवसेनेचा एक नेता त्याबरोबर नागपूरला आला व ते कधी विमानतळावर येता. याची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला तरी जयस्वाल न आल्याने ते कोठे गेले याची माहिती घेतली जाऊ लागली. तेव्हा ते सर्वप्रथम गेले ते आपला जीवलग मित्र चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी. जयस्वाल यांनी मित्रप्रेमापोटी तब्बल दीड तास विमान खोळंबून ठेवले होते.

Visit : policenama.com