तळेगाव दाभाडे येथे नवविवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे/तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – मावळमधील तळेगाव दाभाडे येथे एका नवविवाहीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी घडली असून बहिणीने आत्महत्या केल्याचे समजताच तिच्या बहिणीला धक्का बसल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संजना दिपक लोखंडे (वय – 19, रा. भिमाशंकर कॉलनी, मोराळे, तळेगाव) असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजना दिपक लोखंडे यांचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला आहे. आज दुपारी ती भिमाशकर कॉलनीत राहणाऱ्या पाहुण्यांच्या घरी गेली होती. त्याठिकाणी तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे.

दरम्यान, संजना यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या बहिणीला समजली. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यांना अत्यावस्थ अवस्थेमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संजना लोखंडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. संजना यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like