झालेल्या भांडणात ‘त्यांनी’ खरोखरच ‘त्याचे’ दात घातले घशात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भांडणे, वादावादीत तुझे दात पाडीन, घशात घालील अशी धमकी दिली जाते. प्रत्यक्षात मात्र, कोणी तसे करत नाहीत. पण काही कारणावरुन तिघा जणांनी एका युवकाला केलेल्या मारहाणातील खरोखरच त्याचे दोन दात घशात गेले. ही घटना देहुरोडमधील आंबेडकरनगरमध्ये घडली आहे.

याप्रकरणी प्रथमेश किशोर ओव्हाळ (वय १७, रा़ आंबेडकरनगर, देहुरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश व त्याचे मित्र १३ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कृपाशक्ती मित्र मंडळाचे शेड बांधण्याचे काम करीत होते. यावेळी तीन अनोळखी मुले तेथे आली.

त्यांनी प्रथमेश याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी तिघांनी त्यांच्या तोंडावर बुक्क्यांनी मारले. त्यात त्यांचे समोरील डाव्या बाजूचे दोन दात पडले. मारहाण केल्यानंतर ते तिघे पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

नवजात बाळांच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

लहान मुलांना पॅरासिटामॉल देताना घ्या ‘ही’ काळजी

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल

You might also like