व्यक्ती नव्हे, व्यवस्था बदलण्याची गरज : अनिल घनवट

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन (विष्णू बुरगे) – लातुर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी रुपेश शंके हा तरुण शेतकरी संघटना पुरस्कृत स्वतंत्र भारत पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. त्यासाठी आपणही नीवडणुक लढवावी असं त्याला वाटत आहे. त्यासाठी शेतकरी संघटनेने आपला उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवला आहे.

आज भूमिका मांडण्यासाठी त्यांनी लातुर येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केले होते. मात्र हिरीरीने सहभागी होणारे पत्रकार मात्र आज गैरहजर होते. कारण समजलं नाही. मात्र, आमचा विचार लोकांपर्यंत पोहचावा, शेतकऱ्यांवर होणारे अन्याय लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आम्ही उमेदवार लोकसभा रिंगणात उतरवला आहे असं अनिल घनवट यांनी सांगितले.

आमच्याकडे पैसा नाही, आम्हाला निवडणूक जशी लढायची तशी लढता येणार नाही. मात्र आमचा विचार निवडणुकी दरम्यान लोकांपर्यंत पोहचावा या साठी आम्ही निवडून लढवत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, शेतकरी आत्महत्या यावर कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळं आम्हाला नोवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागतंय असंही त्यांनी सांगितलं. मात्र आमचा विचार पोहचवणारे मध्यमांचे प्रतिनिधी आले नाहीत याची खंत वाटते, असेही घनवट म्हणाले.