आमदारांसमोर भाजप नगरसेवकांत हाणामारी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – पाथर्डी नगरपालिका हद्दीतील टॅकरने होणारा पाणीपुरवठा एकाच प्रभागात पळवून यापूर्वी पालिकेच्या टँकर ठेक्याची बिले पालिका अधिकाऱ्यांना सांगून थकवल्याच्या रागातून डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आमदार मोनिका राजळे व जिल्हापरिषद अध्यक्षा शालिनी विखे यांच्या समोरच दोन नगरसेवकांनी एकमेकांना लाथाबुक्यांनी हाणामारी व शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. रविवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली.

शासनाने पालिका परिक्षेत्रातील प्रभाग क्रमांक २ व ८ मधील वाड्या वस्त्यावर ७ टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी २१ खेपा मंजूर केल्या होत्या. परंतु सर्व खेपा एका नगरसेवकाने प्रभाग २ मध्ये वळविल्याने पाथर्डी नगरपालिकेच्या हद्दीतील भापकर वस्ती, धस वस्ती, खोर्डे वस्ती याठिकाणी व्यवथित पाणीपुरवठा होत नसल्याने येथील रहिवाशांमी दोन दिवसापूर्वी पालिकेवर मोर्चा काढला होता.

परंतु आश्वासन देवूनही काहीच कार्यवाही न झाल्याने तसेच यापूर्वी पालिकेच्या टॅकर ठेक्याची बिले पालिका अधिकाऱ्यांना सांगून थकवल्याच्या रागातून प्रभाग क्रमांक ८ चा नगरसेवक संतप्त झाला. त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळी अकरा वाजता आलेल्या आमदार मोनिका राजळे व जिल्हापरिषद अध्यक्षा शालिनी विखे यांच्यासह भाजपा तसेच मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोरच दोन नगरसेवकानी एकमेकांना लाथाबुक्यांनी हाणामार व शिवीगाळ केली. यावेळी मार खाल्लेल्या एका नगरसेवकाने वेळेचे भान राखून घटना ठिकाणहून अक्षरश पळ काढला. पालिका वर्तुळात जय-विरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन नगरसेवकातील हाणामारीची शहरात दिवसभर खमंग चर्चा सुरु होती.

Loading...
You might also like