चिंचवड मतदार संघातुन 24 जणांनी नेले अर्ज

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजप शहराध्यक्ष विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांनी तर शिवसेना गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर यांच्यासह 24 जणांनी 54 अर्ज नेले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इच्छुकांची अर्ज नेण्याची लगबग सुरु झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी चार अर्ज नेले आहेत. तर, महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी देखील चार अर्ज नेले आहेत.

राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे यांनी देखील प्रत्येकी चार उमेदवारी अर्ज नेले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आजपर्यंत एकूण 24 जणांनी 54 उमेदवारी अर्ज नेले आहेत.

या मतदार संघात भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाला रिंगणात उतरवनार हे महत्वाचे ठरणार आहे. याच सोबत अपक्ष म्हणून कोणी नाराज, बंडखोर शड्डू मारणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. युती नंतर या मतदार संघात शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.

Visit : policenama.com