मानलं मुंबईकर वाइन शॉपवाल्याला, तब्बल 121 खंडणी बहाद्दरांना खावी लागली तुरूंगाची हवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईसारख्या ठिकाणी तक्रार करण्याच्या धमक्या देऊन व्यापारी आणि व्यावसायिकांना त्रास देण्याचे व त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार नवे नाहीत. येथील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, स्थानिक गुंड आणि पोलिसांचा देखील यात समावेश असतो. तसेच काही मोठ्या मंडळींची नावं वापरून काही भामटेही खंडणी वसूल करत असतात. अशाच चार भामट्यांना मुंबईतील अशोक पटेल या वाइन शॉप मालकाने अद्दल घडवली आहे. विशेष म्हणजे पटेल यांनी आतापर्यंत अशा भामट्या १२१ खंडणीखोरांना तुरुंगाची हवा खाण्यास भाग पाडले आहे.

पटेल हे फोर्ट मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. या फोर्टमधील सिधवा रोडवर त्यांचे एक वाइन शॉप आहे. गेल्या आठवड्यात पांढऱ्या कपड्यांमध्ये काही लोक त्यांच्या वाईन शॉपमध्ये आले होते. त्यांनी सांगितले की आम्ही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहोत असं सांगून त्यांच्याकडे लायसन्स आणि इतर कागदपत्रांची मागणी करू लागले. त्यांनी आपल्या मागणीत महिन्याला सात लाख रुपये हप्ता आणि वाईनच्या काही बाटल्यांची मागणी केली. दम्यान पटेल यांनी मंगळवारी त्यांना अंतिम बोलणीसाठी बोलावले. पटेल यांनी या दरम्यानच्या काळात मरीन ड्राइव्ह पोलिसांना माहिती दिली.

ठरल्याप्रमाणे मंगळवारी एक जण दुकानात आला आणि पटेल यांनी चतुराईने त्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं. तोपर्यंत पटेलच्या शॉपीमधील त्यांच्या मुलानं बाहेर जाऊन दुकानाचा दरवाजा लावला आणि खंडणीबहाद्दर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या खंडणीबहाद्दरचे नाव राजेंद्र वाघमारे असून तो दादर येथे राहतो. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना देखील पकडले आहे. त्या तिघांचे नाव संजय अहिरे, जनार्दन ग्यानीत आणि मनीष तांबे असे असून त्यांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांचा संशय आहे की हे चौघे अन्य दुकानदारांकडूनही खंडणी वसूल करत असावेत.

पटेल हे मूळचे भूज येथील रहिवासी असून ते कायद्यानुसार चालणारे गृहस्थ आहेत. जो कोणी कायदा मोडेल त्याला त्यांचा नेहमीच विरोध असतो. आतापर्यंत त्यांनी जवळपास १२१ खंडणीबहाद्दरांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना १०० पेक्षा अधिक सरकारी पुरस्कार व प्रमाणपत्रं देखील मिळाली आहेत. त्यांनी अद्दल घडवलेल्यांमध्ये पोलीस निरीक्षक, महापालिका, आयकर खाते, अग्निशमन दल, रेल्वे पोलीस दल, म्हाडा व अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अनेकांचा यात समावेश आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like