धक्कादायक ! पोलिसांची अशीही थर्ड डिग्री, गुन्हा कबूल करण्यासाठी प्रायवेट पार्टमध्ये पेट्रोल ओतून दिला करंट

कानपूर : वृत्तसंस्था – खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या दोन तरुणांना तपासाच्या नावाखाली थर्ड डिग्री देताना त्याच्या प्रायवेट पार्टमध्ये पेट्रोल टाकून करंट देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप दोन तरुणांनी पोलिसांवर केला आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातील बिठूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला असून ठाणे प्रमुखाला याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

२९ मार्च रोजी बिठूर रेल्वे पटरीवर निर्मल नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर उन्नावमध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्रांना मोनु निषाद आणि सोनू या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मंगळवारी रात्री त्या दोघांना पोलिसांनी रात्री गुन्हा कबूल करण्यासाठी मोनूला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याच्या प्रायवेट पार्टमध्ये पेट्रोल टाकून त्यात करंट दिला गेला. त्यामुळे अचानक पेट्रोलने पेट घेतला. पोलिसांनी आग विझवली आणि त्याला लागलीच नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मोनूच्या कुटुंबियांनी याप्रकरणी गोंधळ सुरु केला. त्यानंतर मोनूने त्याच्याकडे असलेल्या माचीसने पेटवून घेतले आहे. असा खुलासा पोलिसांनी केला आहे. परंतु रुग्णालयात दाखल मोनू ने पोलिसांच्या या संतापजनक कृत्याची माहिती दिली आहे. तर त्यानंतर पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या प्रमुख सुधीर पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.