‘या’ मतदार संघातील मशीन बंद ; वेळ वाढवण्याची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावरील मतदान मशीन बंद पडले. या केंद्रावर काही वेळ अधिका-यांची तारांबळ उडाली. काही काळ मशीन बंद पडल्याने वेळ वाढवण्याची मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

सकाळीच मतदारांची मोठी गर्दी झाली होती. लोकसभेसाठी आज सकाळी मतदान सुरू झाले. परंतु सकाळी साडेआठ ते साडेनऊ या कालावधीत मतदान मशीन बंद पडले होते. सकाळीच मतदारांची गर्दी झाली होती. त्यामुळे या केंद्रावर काही वेळ गोंधळ उडाला. अधिकारी लगेचच या केंद्रावर हजर झाले. सुमारे एक तासाच्या कालावधीनंतर मशीन सुरू झाल्यानंतर मतदान सुरू करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी या बुथवरील मतदानाचा कालावधी एक तासाने वाढवून मिळावा, अशी मागणी केली. त्यावर बुथ प्रमुखांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जेवढे मतदार उपस्थित असतील तेवढे घेण्यात येतील असे सांगितले. त्यावर कार्यकर्त्यांनी मशीन एक तास बंद असल्याचे लेखी मागितले. त्यामुळे या केंद्रावर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.