आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा : नीरेतील शिक्षकाने अवघ्या 4 तासांत पार केले 42 किमी

नीरा : पोलिसनामाा ऑनलाईन (मोहंम्मदगौस आतार) – विद्यार्थ्यांनी चांगले शिकून उत्कृष्ट अधिकारी, उद्योजक बनले पाहिजेत यासाठी प्रत्येक शिक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. मात्र पुरंदर तालुक्यातील नीरा येथील रहिवाशी असलेले व जेऊर (ता.पुरंदर) येथील जि.प. शाळेतील शिक्षक सुधाकर सुरेश सोनवणे यांनी विद्यार्थी हे शिक्षणाबरोबर चांगले खेळाडू बनावेत हे उद्दिष्ट ठेवले आहे. खेळाडू बनन्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता ते स्वतः गेली आठ वर्षापासून विविध मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत आहेत. तर नुकत्याच मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सुधाकर सुरेश सोनवणे यांनी चार तासांत ४२ कि.मी. अंतर पार करून यश संपादन करून विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

निरोगी व सदृढ आरोग्यासाठी नियमित धावणे व चालणे असा सल्ला नेहमी डॉक्टर देत असतात. त्यानुसार अनेक तरुण नियमित चालणे, धावणे यासारखे व्यायाम करून आपले आरोग्य निरोगी ठेवत असतात. सद्या धावण्याकडे उद्योजक, नोकरदार असलेले अनेक तरूण झुकलेले पहावयास मिळत आहे. दिवसभर मुलांना शिकवून थक्क झालेले शिक्षकही पहावयास मिळत असतात. मात्र सुधाकर सुरेश सोनवणे हे शिक्षक मात्र याला अपवाद आहेत. सोनवणे यांनी लहान वयात विद्यार्थ्यांना धावण्याची आवड निर्माण व्हावी व आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. ते विद्यार्थी पुढे चांगले धावपट्टू, खेळाडू बनावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे हे उद्दिष्ट ठेऊन सुधाकर सोनवणे हे गेली आठ वर्षांपासून नियमित धावत आहे.

सुधाकर सोनवणे यांनी या आधी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, सातारा हिल मॅरेथॉन, बजाज अलायन्स पुणे मॅरेथॉन, ए एफ एम सी पुणे मॅरेथॉन, कोनेक्रेन्स जेजुरी मॅरेथॉन, शरद मॅरेथॉन बारामती अशा विविध ठिकाणच्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

मुंंबई येथे आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील टाटा मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नीरा (ता.पुरंदर) येथील सुधाकर सोनवणे या शिक्षकांनी ४२ किलोमीटर अंतर ३ तास ५९ मिनिटांत पुर्ण करून यश संपादन केले आहे. वास्तविक ४२ किलोमीटर हे अंतर पार करण्यासाठी सात तास ही निर्धारित वेळ आहे. मात्र सुधाकर सोनवणे यांनी तब्बल तीन तास अगोदरच हे अंतर पार केले हे विशेष. सुधाकर सोनवणे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –