वाह रे मौलाना ! ‘एवढं’ घाण काम, ‘कोरोना’ व्हायरसला देखील नाही सोडलं, जाणून घ्या प्रकरण (व्हिडीओ)

नवी दिल्ली : जादूटोणा, काळीजादू आणि अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणारे लोक आता अशा मौलानांच्या तावडीत सापडले आहेत, जे कोरोना व्हायरसला नष्ट करत आहेत. ही गोष्टी हैराण करणारी आहे…? होय, सोशल मीडियावर एका मौलानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मौलाना मुलांच्या चायनामेड बंदूकीने कोरोना व्हायरसचा प्रभाव नष्ट व्हावा यासाठी महिलेवर छूमंतर करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना सध्या खुप हसवत आहे.

चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. भोंदू मौलानाने एका महिलेच्या अंधश्रद्धेचा आणि तिच्या मनातील कारोनाच्या भितीचा भरपूर फायदा उचलल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. महिलेवरील जादूटोणा उतरवण्यासोबत तिच्यावर कोरोना व्हायरसचा परिणाम होऊ नये यासाठी मौलानाने असे नाटक केले आहे.

व्हिडिओमध्ये जे दिसत आहे, त्यामध्ये मौलानाने महिलेला आपल्या समोर बसवून मुलांच्या खेळण्यातील चायनामेड बंदूकीने महिलेवरील काळीजादू आणि कोरोना व्हायरसचा परिणाम नष्ट करण्याचा ड्रामा केल्याचे दिसते. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु, यावेळेस कोरोना व्हायरसच्या भितीचे वातावरण सर्वत्र असताना त्यासंबंधिचा हा व्हिडिओ लोकांना चक्क हसवत आहे.