‘जिल्हा नियोजन’च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकाकडून उपनेते राठोडांना ‘धक्का’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा नियोजन समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना धक्का देत राठोड समर्थक असलेल्या अमोल येवले यांचा दारूण पराभव केला. शिवसेना नगरसेवकाने राठोड यांच्यावर मात केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच दुसऱ्या जागेत राष्ट्रवादीचे विनीत पाऊलबुद्धे यांनी शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांचा पराभव केला आहे.

सर्वसाधारण जागेसाठी १ जागा तर नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी १ जागा अशा २ जागेचा निकाल पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण प्रवर्ग- अनिल शिंदे ५२ मते (शिवसेना), अमोल येवले १० मते (शिवसेना)
बाद मतदान ५. नागरीकांचा मागास (OBC) प्रवर्ग – विनित पाऊलबुधे ४८ मते (राष्ट्रवादी), सुवर्णा जाधव १५ मते (शिवसेना), बाद मतदान ४

३ जागेपैकी १ जागेवर भाजपाच्या आशा कराळे बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे उर्वरीत २ जागेसाठी मतदान झाले. त्यात सर्वसाधारण जागेवर शिवसेनेचे उमेदवार अनिल शिंदे यांनी शिवसेनेच्याच अमोल येवले यांचा पराभव करुन विजयी झाले. नागरीकांचा मागास प्रवर्ग (OBC) या जागेवर राष्ट्रवादीचे विनित पाऊलबुद्धे हे शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांचा पराभव करुन विजयी झाले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/