पंकजाताई मुंडे पाथर्डीत झाल्या भावनिक, म्हणाल्या – ‘हा जीव तुमच्याकडे गहाण टाकत आहे…..’

अहमदनगर : (पाथर्डी) पोलीसनामा ऑनलाइन – ही जनता म्हणजे माझा जीव आहे, हा जीव तुमच्याकडे गहाण टाकत आहे. त्यांना प्रेम विश्वास व सन्मान द्या. त्यांना जीवापाड जपा. ही सर्व माणसे जीवाला जीव देणारी आहेत, अशा शब्दांत आज सायंकाळी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पाथर्डीत भावनिक आवाहन आ. मोनिका राजळे यांना केले.

मुंडे म्हणाल्या की, मी भाजपाची स्टार प्रचारक असल्याने पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे. पक्षाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एक एक आमदार महत्त्वाचा आहे. प्रत्येक मतदारसंघातील एक-एक मत पक्षाच्या मुख्यमंत्रीपदासाठी उपयोगी पडणार आहे. राज्यात तुमच्या लेकीचे सरकार येणार असून, त्यासाठी आमदार मोनिका राजळे यांना माझ्याबरोबर विधानसभेत पाठवा. जातीपातीच्या राजकारणामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं जहाज बुडत आहे.

गेल्या काही दिवसापासून शेवगाव-पाथर्डी मतदार संघात तर्क-वितर्क सुरू झाले होते . राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या समर्थकांकडून पंकजाताई सभेसाठी येणार नाहीत, त्यांचा आम्हालाच आशीर्वाद आहे, अशा प्रकारचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झाला होता . आजच्या सभेमुळे मात्र या सर्व शंका-कुशंकाना पूर्णविराम मिळाला आहे.

यावेळी खासदार डॉ.सुजय विखे ,आमदार शिवाजी कर्डिले ,आमदार मोनिका राजळे ,माजी खासदार दिलीप गांधी, अभय आव्हाड, डॉ.मृत्युंजय गर्जे, ज्येष्ठ नेते अर्जुन शिरसाठ, अमोल गर्जे, बाबासाहेब ढाकणे, भिमराव फुंदे, नितीन काकडे, रामनाथ राजपुरे, मोहनराव पालवे ,बाळासाहेब सोनवणे यांच्यासह शेवगाव-पाथर्डी तालुक्यात विविध संस्थांचे पदाधिकारी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष केकाण, तर आभार माणिक खेडकर यांनी मानले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी