देहूरोड परिसरात महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – देहूरोडजवळ मामुर्डी येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.

खून झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. तिचे वय अंदाजे 40 वर्ष आहे. महिलेने गुलाबी टीशर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अकराच्या सुमारास देहूरोड पोलिसांना माहिती मिळाली की, देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर मामुर्डी येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला कच-यामध्ये एक मृतदेह पडला आहे. माहिती मिळताच देहूरोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

महिलेच्या डोक्यात मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. तसेच तोंडामध्ये ओढणी घातली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटली नाही. खून करून मृतदेह फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

रेल्वे प्रवाशांना शंभर रूपयात मसाज सुविधा

इरेक्शनची समस्या अशी सोडवा, घ्या शरीरसुखाचा आनंद

चेस्ट आणि अंडरआर्मचे केस काढण्यापूर्वी घ्या ‘ही’ काळजी

अवघ्या २ रुपयांत कॅन्सरवर उपचार शक्य, एका डॉक्टरचा दावा