रजिस्ट्री ऑफीस मधील गोपवाड यांच्या विरूद्ध केलेले आरोप प्रा. बांगर यांनी सिद्ध करावे – मुसा खान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – रजिस्ट्री ऑफीस मधील गोपवाड यांना खुर्ची सुटेना अशी बातमी प्रा. बांगर यांनी दिली. बांगर यांनी जे आरोप केेले आहेत ते त्यांनी सिद्ध करावेत. 2003 पासुन आजपर्यंत कोणताही अधिकारी/कर्मचारी हा एकाच पदावर एकाच खुर्चीवर बसत नाही. तसे कोणत्याही कायद्यात नाही. त्या ठिकाणी एकुण तीन ऑफीस आहेत. त्या तीन ऑफीसमध्ये त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. बांगर बीनबुडाचे आरोप करीत आहेत. जे त्यांनी पेपरमध्ये म्हटले आहे ते सिद्ध करावे.

बांगर यांचे काही काम त्यांनी नियम बाह्य कामे केलेली नाही म्हणुन प्रा. बांगर यांनीे प्रसिद्धी माध्यमातुन गोपवाड विरूद्ध तक्रारी करण्याचे काम करित आहेत. अ‍ॅड. अजित देशमुख यांनी दस्तलेखकांचे दस्तलिखाईचे दर लावणे बाबत रजिस्ट्री ऑफीसला सांगितले होते. त्या प्रमाणे ते दर फलक लावलेले आहेत. त्या दराप्रमाणेच त्यांना पैसे द्यावेत. या बाबत जनतेपर्यंत गेल्याने दस्तलेखक जी लुट करीत आहेत त्यास आळा बसल्यामुळे या कारणास्तव प्रा. शिवराज बांगर यांनी बीन बुडाचे आरोप करून अधिकाऱ्यांचे बदनामी करण्याचे काम सुरू केेले आहे. दस्तलेखक यांची त्याला त्याची याला लावुन दस्ततयार करणे व अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे काम करीत आहेत.

अ‍ॅड. अजित देशमुख यांनी दोन महिन्यात झालेल्या एन.ए. च्या पावतीची तहसीलदार यांचे कडुन एन.ए. हा त्यांचे कार्यायाकडून निर्गमित झालेला आहे की नाही याची खात्री करणेसाठी रजिस्ट्री ऑफीसला सांगीतले आहे. यामध्ये सत्य बाहेर येईलच काही व्यावसायिक / दलाल हे जमीन खरेदी करतांना जमीन म्हणुन घेतात व नंतर प्लॉटींग करतात ते एन.ए. हा पुर्वीचा दाखवतात म्हणजे यांनी जमीन म्हणुन खरेदी करतांना शासनाचे महसुलाचे नुकसान करतात. ह्या चुकीच्या पद्धतीला आळा बसण्याचे काम रजिस्ट्री कार्यालय करीत आहे. व्यावसायिकांना / दलालांना शासनाचा मुद्रांक शुल्क बुडवायचा आहे. नोंदणी कार्यालयाचे काम पुर्णपणे ऑनलाईन झालेले आहे. सर्व बाबी जनतेपर्यंत सहज पोहोचता येईल अशा रितीने आहेत. येवढी पारर्शकता असतांना गोपवाड यांचे वर आरोप करणे हे फक्त मानसिक त्रास देणे व खंडणी मागण्याचा उद्देश दिसुन येत आहे. प्रा. बांगर यांनी आरोप सिद्ध करावेत अशी मागणी समाजसेवक मुसा खान पठाण यांनी केेली आहे.

You might also like