भाजप युवामोर्चा ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षाचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

उमेश म्हेत्रे हे दौंडचे आमदार राहुल कुल यांचे कट्टर समर्थक

 दौंड – पोलीसनामा ऑनलाइनअब्बास शेख – भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष उमेश महादेव म्हेत्रे यांचा उद्या देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार, राष्ट्रवादीचे स्टारप्रचारक अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे.

अशी माहिती स्वतः उमेश म्हेत्रे यांनी दिली आहे. उमेश म्हेत्रे हे दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांची ऑगस्ट २०१८ मध्ये भाजप युमो ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

याबाबत म्हेत्रे यांनी माहिती देताना निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून फक्त लांगुलचालन करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच वाव दिला जात होता. आम्ही सांगितलेली कामे होत नव्हती असा आरोप त्यांनी करत वारंवार सांगूनही ओबीसीच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. समाजाला मंञी मंडळात स्थान नाही.

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी केलेली आहे. या विविध गोष्टींमुळे आपला भाजपवरचा विश्वास उडाला आहे त्यामुळे आपण शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेच्या पाटस येथे होणाऱ्या सांगता सभेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले