Vivo च्या ‘या’ 3 स्मार्टफोन्सवर 10 हजारांपर्यंत ‘सूट’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – विवोने ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये स्मार्टफोन्सवर तुम्हाला 10 हजारांपर्यंत सुट मिळू शकते. जर तुम्ही स्मार्टफोन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या सेलमध्ये विवोच्या प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर 13 फेब्रुवारी पर्यंत बेस्ट ऑफर आणि डिस्काउंट आहे. आयसीआयीआय बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 1500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जाणार आहे.

विवो व्ही 15 प्रो
या फोनवर 10 हजार रुपयांची सूट असून हा फोन 19 हजार 990 रुपयात खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा, 6 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास 3 हजारांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे.

विवो यु 10
विवोचा हा स्मार्टफोन 8 हजार 990 रुपयात खरेदी करता येऊ शकतो. या खरेदीवर ग्राहकाला 1500 रुपयांचे अ‍ॅमेझॉन कूपन मिळते. या फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी, स्नॅपड्रॅगन 665 एआयई प्रोसेसर आहे.

विवो यु 20
विवोचा हा फोन 10 हजार 990 रुपयात खरेदी करता येवू शकतो. यामध्ये 4 जीबी रॅम आहे. तर 6 जीबी रॅमचा फोन 11 हजार 990 रुपयांत मिळू शकतो. ग्राहकांना खरेदीवर 1000 रुपयांचे अ‍ॅमेझॉन कूपन मिळत आहे.