महर्षि कर्वे यांचे विचार आचरणात आणा : प्रा. डॉ. नलिनी पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शिक्षणातून महिला सबलीकरण करण्याचा ध्यास घेतलेल्या महर्षी कर्वे यांच्या विचारांची आजही गरज आहे. आज कोरोना संक्रमणामुळे भयभीत झालेल्या समाजाला सावरण्याचे काम खंबीरपणे करताना सुशिक्षित गृहिणींमध्ये दिसत आहे. शिक्षणाचा देदिप्यमान वसा धारण करणारे एसएनडीटी महिला विद्यापीठ हे केवळ विद्यापीठ नसून, महर्षी कर्वेंचे उत्तुंग स्वप्न साकार करणारे महिला सबलीकरणाचे एक अक्षयस्थान आहे. महर्षी कर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे स्त्री हा मानवजातीचा एक महत्त्वाचा घटक असून, प्रत्येक स्त्रीचे दैनंदिन जीवन हे राष्ट्रीय प्रगतीशी जोडले गेले आहे, एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य व शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचायर् डॉ. नलिनी पाटील सांगितले.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जयंतीनिमित्त एन.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचा पाया 104 वर्षांपूर्वी भारतीय महिला विद्यापीठ या नावाने महर्षि कर्वे यांनी रचला. या इमारतीमध्ये शासकीय नियमांचे पालनकरून कर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवान करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दीपक देशपांडे, प्राचार्या डॉ. नलिनी पाटील, कला वाणिज्य विद्यालयाचे प्राचार्य आनंद जुमळे, माजी उपप्राचार्य व शाळा समिती सदस्य सुरेंद्र निरगुडे, विद्यार्थिनी, वसतिगृहप्रमुख, सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, प्रकुलगुरू डॉ. विष्णू मगरे, पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कर्वे यांचे शतशः ऋणी आहेत, अशी भावना माननीय कुलगुरूंनी केली.