शरद पवारांच्या भेटीबाबत आमदार जयकुमार गोरे म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे पुण्यातील मोदी बागेत गेले होते. मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान आहे. परंतु जयकुमार गोरेंनी याबाबत त्यांना काही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. मला काही माहिती नसल्यानं पवारांना भेटण्याचा प्रश्नच नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या मोदी बागेत येण्यानं राजकीय घडामोडींमध्ये नवीन ट्विस्ट आला आहे.

जयकुमार गोरे मोदी बागेत आल्यापासून त्यांच्या आणि पवारांच्या भेटीची चर्चा सुरु आहे. याबाबत बोलताना जयकुमार गोरे म्हणतात, “मी शरद पवारांची भेट घेतली नाही. मी भाजपसोबतच आहे. विधीमंडळ नेते देंवेंद्र फडणवीस यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. आजच्या घडीला मला दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटण्याची गरज नाही.” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असा दावा केला होता की, भाजपचे निवडून आलेले आणि निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले आमदार संपर्कात आहेत. यावरही गोरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. गोरे म्हणाले, “हा आमच्या संपर्कात. तो आमच्या संपर्कात असं बोलण्याची जयंत पाटलांची सवय आहे. परंतु कोण कोणाच्या संपर्कात आहे हे समजण्यासाठी काही अवधीच शिल्लक आहे. तुम्हाला लवकरच समजेल की, सत्ता स्थापन होताना कोण कोणाच्या सोबत आहे.”

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like