चितळे उद्योग समूहाचे ‘सर्वेसर्वो’ काकासाहेब ‘चितळे’ यांचे निधन

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – चितळे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा काकासाहेब चितळे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने काकासाहेब चितळे यांचे वयाच्या 78 वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने आज सांगलीत काकासाहेब चितळेंनी अखेरचा श्वास घेतला.

चितळे उद्योग समूह राज्यभरात, देशभरात ओळखा जातो. मिरजमध्ये काल त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काकासाहेब चितळ्याचे यांचे चिरंजीव गिरीश चितळे यांनी या घटनेची माहिती दिली. चितळे उद्योग समूहाचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यात काका साहेब चितळे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

चितळे समूहाचे आधारवड काळाच्या पडद्याआड गेल्याने चितळे कुटूंबावर आणि उद्योग समूहावर शोककळा पसरली आहे.