नाश्ता बनवला नाही म्हणून वयोवृद्ध मावशीची हत्या

ठाणे : पोलीसनामा आॅनलाईन 

नाश्ता न बनवल्याच्या शुल्लक कारणावरून वयोवृद्ध मावशीवर चाकूने हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील विनायक भवन सोसायटीत घडली आहे. शोभा गणेश कुलकर्णी (७५) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या भाचीने शोभा गणेश कुलकर्णी (७५) त्यांची हत्या केली आहे. राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी स्वप्ना हिला अटक केली आहे.

शोभा या विनायक भवन सोसायटीतील त्यांच्या निवासस्थानी भाची स्वप्ना सोबत राहत होत्या. शोभा हा अविवाहित होत्या तसेच त्या अंध होत्या.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6148b156-cae7-11e8-965d-c3a8c0e83f44′]
अंध असूनही त्या घरातील सर्व काम करत होत्या. शनिवारी दुपारी बेशुद्ध अवस्थेत शोभा यांना सिव्हिल रुग्णालयात आणले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूविषयी संशयी वाटल्याने रुग्णालयाने पोलिसांना कळवले.

पोलिसांनी शोभा यांच्या मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता मृतदेहावर १५ जखमा आढळून आल्या. त्यामुळे सदर प्रकारची पोलिसांनी चौकशी सुरु केली. शोभा राहत असलेल्या घराची बारकाईने तपासणी केली असता जमिनीवरील रक्ताचे डाग साफ करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब पुढे आली. तसेच भिंतीवरील रक्ताचे डागही पुसण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे पोलिसांनी स्वप्ना हिच्याकडे चौकशी केली असता तिने हत्या केल्याची कबुली दिली. सकाळी शोभा यांनी नाश्ता तयार केला नाही. परिणामी बाचाबाची झाली आणि स्वप्नाचा राग अनावर झाल्याने संतापाच्या भरात तिने शोभावर चाकूने वार केले.

पोलिसांनी आरोपी स्वप्नाला अटक केली असून या प्रकरणी राबोडी पोलिस ठाणे याबाबत अधिक चौकशी करत आहे .

[amazon_link asins=’B00KGZZ824,B008V6T1IW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9f891fd7-cae7-11e8-982c-c1018a357143′]

विमाननगर येथील थाई स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

 

पुणे : पुण्यातील विमाननगर परिसरात असलेल्या औरा थाई स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ विदेशी मुलींसह २ भारतीय मुलींची सुटका करण्यात आली. ही कारवाई रविवारी (दि.७) रात्री सव्वा नऊच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

स्वप्नील संजय गायकवाड (वय-३३ रा. स्वप्न नगरी अपार्टमेंट, सिंहगड रोड,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रोझ ओकेंद्रसिंग खैदेम (वय-२७ रा. पॉप्युलर हाईट, कोरेगाव पार्क, मुळ रा. मणिपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उप निरीक्षक चित्रा चौधरी यांनी फिर्याद दिली आहे.

विमाननगर येथील स्काय मॅक्स बिल्डींगमधील औरा थाई स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती विमाननगर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा करुन घेतली. डमी ग्राहकाने वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे सांगितल्यनंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकून ४ थायलंड येथील मुलींची तर मेघालय येथील २ मुलींची सुटका केली करुन स्वप्नील गायकवाडला अटक केली. पैशांचे अमिष दाखवून गायकवाड हा मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता.