अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा आत्मघातकी हल्ला, गोळीबारात 9 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उत्तर अफगाणिस्तानात अतिरेकी आणि सरकारी सुरक्षा दलातील गोळीबारात कमीतकमी नऊ जण ठार झाले, तर अनेक जखमी झाले आहेत. एका कारमधील तालिबानच्या आत्मघातकी हल्ल्यात स्फोटानंतर गोळीबार सुरू झाला. प्रांतीय परिषदेचे सदस्य राझ मोहम्मद खान म्हणाले की, हल्ला समांगन प्रांताची राजधानी ऐबक येथे झाला. या हल्ल्यात एका महिलेसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६३ जण जखमी झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. खान यांनी चेतावणी दिली की, ही प्राथमिक आकडेवारी असून मृतांची संख्या आणखी वाढू शकते. ते म्हणाले की, गोळीबारात किमान दोन तालिबानी सैनिक ठार झाले आहेत. यापूर्वी प्रांतीय रुग्णालयाचे प्रमुख अब्दुल खलील मुसादिक यांनी सांगितले होते की, किमान ४३ लोक जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुले आणि बहुतांश सामान्य नागरिक आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे.

प्रांतीय परिषदेचे उपप्रमुख मोहम्मद हासीम सरवारी यांच्या म्हणण्यानुसार, आत्मघाती हल्लेखोरांनी ऐबकमधील इंटेलिजेंस सर्व्हिस विभागाला लक्ष्य केले आणि त्यानंतर इतर तालिबानी सैनिकांनी अफगाण सैन्यांवर गोळीबार सुरु केला. ते म्हणाले की, हा स्फोट इतका जोरात होता की त्याचा आवाज कित्येक मैल ऐकू गेला आहे आणि त्यामुळे अनेक इमारती व घरांचे नुकसान झाले आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद म्हणाले की, प्रांतात कार्यरत असलेल्या तालिबान्यांनी अलीकडेच त्यांचे हल्ले अधिक तीव्र केले आहेत आणि या स्फोट व हल्ल्यामागे त्यांचा हात आहे. तालिबानी सैनिक आणि सुरक्षा दलात तासभर चकमक चालू होती आणि दूरस्थ स्थान असल्यामुळे अचूक माहिती आलेली नाही.

तालिबानने १४ चौकींना केले लक्ष्य

उल्लेखनीय आहे की, समांगन प्राचीन व्यापार मार्गावर आहे आणि अलीकडेच तालिबानचे हल्ले येथे वाढले आहेत. पण या भागातील इस्लामिक अतिरेक्यांशी विशेषत: उझबेकसह देखील संघर्ष वाढला आहे, कारण ते इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उझबेकिस्तानशी संबंधित आहेत. प्रांतातील गव्हर्नरचे प्रवक्ता एस्मातुल्लाह मुरादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने रविवारी उत्तर कुंदुज प्रांतात १४ तपास चौक्यांना लक्ष्य केले, ज्यात अफगाण सुरक्षा दलाचे किमान १४ सदस्य मारले गेले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like