राज्यातील ५ आयपीएस अधिकार्‍यांसह ९ उपायुक्‍तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (शुक्रवारी) 5 आयपीएस अधिकार्‍यांसह 9 पोलिस अधीक्षक/उपायुक्‍त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. काही दिवसापुर्वीच राज्य गृह विभागाने अप्पर पोलीस अधीक्षक/उपायुक्‍त आणि पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आज 9 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे.

विरेंद्र मिश्रा-आयपीएस ( नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते उपायुक्‍त, पुणे शहर), विनिता साहु-आयपीएस (उपायुक्‍त, मुख्यालय, नवी मुंबई-बदली आदेशाधीन ते उपायुक्‍त, नागपूर शहर), श्रीधर जी. – आयपीएस (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 12, वडसा-देसाईगंज – बदली आदेशाधीन ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 4, नागपूर), निखिल एन. पिंगळे (अप्पर अधीक्षक, गोंदिया-बदली आदेशाधीन ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 13, वडसा-देसाईगंज), अतुल कुलकर्णी -आयपीएस (अप्पर अधीक्षक, अकोला – पदोन्‍नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन ते अप्पर अधीक्षक, गोंदिया – पदोन्‍नतीने), श्रीकृष्ण कोकाटे (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 4, नागपूर – बदली आदेशाधीन ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, ठाणे), श्रीमती दिपाली प्रमोद काळे(कांबळे) (अप्पर अधीक्षक, अहमदनगर – पदोन्‍नतीने पदस्थापनेच्या आदेशाधीन ते अप्पर अधीक्षक, श्रीरामपूर, अहमदनगर), शिवराज बापूसाहेब पाटील (सहाय्यक विशेष पोलिस महानिरीक्षक, मुख्य संपादक, दक्षता / धोरण, महाराष्ट्र राज्य, मुंबई – बदली आदेशाधीन ते पोलिस उपायुक्‍त, मुख्यालय, नवी मुंबई) आणि मनोज पाटील (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते पोलिस अधीक्षक, राज्य नियंत्रण कक्ष, मुंबई)

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like