नीरा प्रा.आरोग्य केंद्राचा कारभार 8 दिवसांंपासून डाँक्टरविनाच, रूग्णांना अत्यावश्यक सेवा मिळेनात

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन –   पुरंदर तााालुक्यातील नीरा येथील प्राथमिक आरोग्य
केंद्राचा कारभार गेल्या आठ दिवसांपासून डाँक्टरविना सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टर नसल्याने नीरा आरोग्य केंद्रात अत्यावश्यक सेवा मिळू शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधी व आरोग्य अधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्याने पुरंदरच्या आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

पुरंदर तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून डॉक्टरच नसल्याने आरोग्य केंद्र डाँक्टरविना सुरू आहे. नीरा येथे कोरोना रूग्णांची संख्या सुमारे १६५ च्या जवळपास झाली आहे. त्यामुळे नीरा गांव कोरोनाचे हाँट स्पाँट गांव म्हणून ओळखले जात आहे. अशा परिस्थितीत येथील वैद्यकिय अधिकारी आजारी असल्याने गेल्या आठ दिवसांपासून सुमारे दीड महिन्याच्या रजेवर गेल्याचे समजते. त्यांच्या गैरहजेरीत आरोग्य विभागाने माळशिरस येथील डॉक्टरांची नीरा प्रा. आरोग्य केंद्रात नियुक्ती केली.

मात्र संबंधित डॉक्टर नीरा आरोग्य केंद्राला दोन – तीन दिवसच भेट देऊन गेल्या. त्यानंतर त्या पुन्हा नीरा प्रा. आरोग्य केंद्रात आल्याच नाहीत. येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी येणा-या सर्वसाधारण रूग्णांना औषधे देतात , खाजगी डाँक्टरांनी एखाद्या रूग्णाला कोविड तपासणी करिता शिफारस केली तर त्या रूग्णाला पत्र देतात. त्यामुळे रूग्णांची अडचण होत नाही. अशा परिस्थितीत नीरा आरोग्य केंद्राचे कामकाज चालू आहे. परंतू नीरा गावांत डेंगू , चिकणगुण्या या सारखे संसर्गजन्य रोगामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नीरा ग्रामपंचायतीच्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीला डेंग्यूची लागण झाल्याने ती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली असता तिला डॉक्टर नसल्याने उपचार मिळू शकले नसल्याचे समोर आले आहे. तसेच एखादी गरोदर महिला उपचाराकरिता आली किंवा अपघातग्रस्त रूग्ण अत्यावश्यक सेवेच्या उपचारा करिता आला तर त्याला उपचार मिळू शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे.

कोरोना महामारीच्या संकटात शासन रूग्णांना वेळवर उपचार मिळण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे जि.प.च्या आरोग्य विभागातील डॉक्टर नियुक्तीच्या ठिकाणी हजर होताना दिसत नाही. हा मोठा विरोधाभास आरोग्य खात्यात आहे याची दखल पुण्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी घेतील का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नीरा आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या कोरोनाग्रस्त कुटुंबाला कोव्हिड सेंटरला जाण्यासाठी आठ तास
रूग्णवाहिकेची वाट पहावी लागली. आता तर नीरा आरोग्य केंद्राला गेल्या आठ दिवसांपासून डॉक्टरच नसल्याने रूग्णांना डॉक्टरांची वाट पहावत बसावे लागत आहे. त्यामुळे पुरंदरच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा अनुुुभव नागरिकांना येत आहे.

नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरात लवकर कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी नीरा – वाल्हा जि.प. गटातील नागरिक करीत आहे.

नीरेतील आरोग्य केंंद्राच्या डॉक्टर रजेवर गेल्याने माळशिरस येथील डॉक्टरांची नियुक्ती केली होती. परंतु त्या दोन -तीन दिवस नीरा आरोग्य केंद्रात गेल्या मात्र पुन्हा त्या नीरा येथे हजर झाल्या नाहीत. दुस-या डाँक्टरांची नियुक्ती करण्याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे.

उज्वला जाधव
तालुका आरोग्य अधिकारी, पुरंदर

नीरा प्रा. आरोग्य केंद्राला नविन डाँक्टरांची नियुक्ती
करून तातडीने हजर राहण्याची सुचना देत आहे.

डॉ. भगवान पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी , जि.प.पुणे.