निर्भया केस : दोषी मुकेश आणि विनयला भेटले कुटूंबिय, आई-वडिलांना पाहून दोघांचे झाले ‘असे’ हाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोषीच्या फाशीसाठी आता थोडेच दिवस बाकी आहेत अशात त्यांच्या नातेवाईकांकडून दोषींची भेट घेण्यास सुरुवात झाली आहे. दोषी विनय आणि मुकेश आई-वडील शुक्रवारी त्यांना भेटायला जेलमध्ये पोहचले होते. वेगवेगळ्या वेळेत दोन्ही दोषींच्या कुटुंबियांना त्यांना भेटून देण्यात आले.

अर्ध्या तासाच्या या भेटीमध्ये दोनीही दोषी आपल्या आई-वडिलांसमोर खूप रडले. जेल प्रशासनाने सांगितले की, आता दोषींच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी कधीही परवानगी आहे फक्त त्यांच्या सोबत जेल अधिकारी देखील उपस्थित असतात. जेल प्रशासनाने दोषींना नोटीस जारी करत सांगितले आहे की, जर तुम्हाला आपली वसियत करायची असेल तर त्याची माहिती देखील द्या.

न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केली नाराजी
दोषींना वाचववण्यासाठी पुन्हा एकदा पटियाला कोर्टात वकिलांनी धाव घेतल्याने दिल्ली सरकारने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उप मुख्यमंत्री मनीष सिसोदीयानें म्हटले की, दोषींच्या वकिलांकडून सिस्टीमचा मजाक उडवला जात आहे आणि केसला पुढे ढकलण्यासाठी रोज नवीन नवीन उपाय शोधले जात आहेत. तसेच लवकर न्याय देण्यासाठी कायद्यात बदल करणे गरजेचे असल्याचे देखील सिसोदिया यांनी सांगितले.

वकील एपी सिंह यांना सर्व आरोपींसाठी सुधारात्मक याचिका दाखल करायची आहे यासाठी त्यांनी दोषींशी संबंधित काही कागदपत्रांची मागणी केली आहे. परंतु कागदपत्रे न मिळाल्यामुळे त्यांनी शुक्रवारी याचिका दाखल करत कागदपत्रांची पूर्तता करण्याची मागणी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –