24 वर्षाचा झाला निर्भया प्रकरणातील ‘अल्पवयीन’ नराधम, आज पण संपुर्ण गावाला वाटते ‘लाज’, आई-वडिल म्हणाले..

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जेव्हा जेव्हा निर्भया बलात्कार प्रकरणाची चर्चा होईल तेव्हा तेव्हा तो अल्पवयीन आठवेल ज्याने त्या मुलीबरोबर दुष्कर्म केले. आता तो 24 वर्षांचा आहे. गावकऱ्यांना देखील माहीत नाही की शिक्षा भोगून आपल्यानंतर आता तो कुठे आहे. गावकरी ते प्रकरण अजूनही विसरले नाहीत.
काळ गेला आता लोकांमधील त्याबद्दलचा संताप देखील धुळीसारखा शांत झाला आहे. त्यांचे म्हणणे आहे की जे झाले ते चूकीचे झाले, परंतु आता आला किंवा न आला तरी कोणत्याही व्यक्तीला काहीही फरक पडत नाहीत.

आई म्हणाली वर्ष झाले पाहिले नाही –
निर्भयाबरोबर दुष्कर्म केलेल्या त्या अल्पवयीन मुलाच्या आईने सांगितले की जेव्हापासून तो गेला तेव्हापासून आजपर्यंत त्याच्याशी बोलणं झालं नाही आणि ना की त्याचा चेहरा पाहिला. 8 वर्षाचा असेल तेव्हा तो काही लोकांबरोबर दिल्लीला नोकरीसाठी गेला होता. तीन चार महिने त्याने घरी पैसे देखील पाठवले, परंतु त्यानंतर त्याने पैसे पाठवले नाहीत. त्यानंतर त्याचा काहीही पत्ता नाही. जेव्हा पोलीस घरी पोहचले तेव्हा कळाले की त्याने असे काही केले आहे. परंतु काही गावकऱ्यांच्या मते तो मागच्या ईदला घरी आला होता.

कोणालारी माहित नाही आता तो कुठे आहे –
निर्भया प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या घराची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. वडील मानसिकदृष्या चिंतित आहे. घरात आई शिवाय बहीण आणि तीन भाऊ आहेत. भावांचे वय 15,13,11 वर्ष आहे. त्याला काही दिवस बालसुधार गृहात ठेवण्यात आले होते त्यानंतर 16 डिसेंबरला त्याला मुक्त करण्यात आले. त्यानंतर सांगण्यात येते की त्याला एका एनजीओमध्ये ठेवण्यात आले होते. आता गावात कोणालाच माहित नाही की तो कुठे आहे.

ज्या शाळेत अल्पवयीन आरोपी शिकत होता ज्या शाळेत त्या प्रवेश देणारे आता या जगात नाहीत. परंतू 2012 मध्ये हे प्रकरण घडले तेव्हा यतेंद्र मोहन शर्मा प्रधानाध्यापक होते. ते स्पष्टपणे म्हणाले की त्याला फाशीची शिक्षा द्यायला हवी होती. ते दोनदा दिल्ली जुवेनाइल न्यायालयात आपली मत ठेवण्यासाठी गेले होते. पोलिसांनी वसंत विहार ठाण्यात त्याच्याबद्दल सांगितले तेव्हा ते अत्यंत संतापले होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/