1599 रुपये किमतीचा Nokia 110 भारतात लॉंच, जाणून घ्या ‘फिचर्स’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एचएमडी ग्लोबलने भारतात दोन फोन लॉंच केले होते, Nokia 7.2 आणि Nokia 6.2 ज्यांची मागणी सतत वाढत होती. त्यामुळे कंपनीने आता Nokia 110 नावाचा नवीन फोन लॉंच केला आहे. या फोनची विक्री 18 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. या फोनमध्ये अनेक नवीन फिचर देण्यात आले आहे.

काय आहेत फीचर्स
नोकिया 110 या फोनमध्ये एफएम रेडियो, एमपी थ्री प्लेयर आणि क्लासिक स्नेक सारख्या अनेक गोष्टी देण्यात आल्या आहेत. या मॉडेलची किंमत 1,599 रुपये इतकी आहे. तसेच निळ्या, काळ्या आणि गुलाबी रंगात या फोन उपलब्ध होणार आहे. या फोनसाठी 1.77 इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. प्लास्टिक बॉडी असलेला हा फोन मेमरी कार्डला सुद्धा सपोर्ट करतो. 32GB पर्यंत एक्स्टर्नल स्टोरेज यामध्ये देता येऊ शकते. तसेच या फोनमध्ये QVGA कॅमेरा देखील असणार आहे. एलईडी टॉर्च लाईट, 800mAh बॅटरी जी कि 18.5 दिवसांचा स्टॅण्डबाय बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.

एचएमडी ग्लोबल या कंपनीकडे नोकियाचे फोन बनवण्याचे मालकी हक्क आहेत. कंपनीचे प्रमुख अधिकारी ज्यूहो सर्व्हेकास (Juho Sarvikas) सांगतात गेल्या काही दिवसामध्ये फिचर फोनची मागणी वाढल्याचे आम्ही पाहिले आहे. त्यामुळेच आम्ही नोकियाचा हा नव्या डिझाईनचा फोन घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये मनोरंजना संदर्भातील अनेक फिचर दिलेले आहेत. ज्याची बॅटरी दीर्घकाळापर्यंत चालू शकणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी