Normal BP | वय आणि महिला-पुरुषांच्या हिशेबाने किती असावा बीपी, पहा चार्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Normal BP | डब्ल्यूएचओच्या मते, जगभरात सुमारे १.२८ अब्ज लोकांना हाय ब्लड प्रेशर आहे, परंतु दुर्दैवाने त्यापैकी ४६ टक्के लोकांना हे देखील माहित नाही की त्यांना ब्लड प्रेशरचा आजार आहे. जेव्हा ते इतर काही समस्यांवर उपचार घेण्यासाठी जातात तेव्हा त्यांना कळते की त्यांचा बीपी वाढला आहे. (Normal BP) आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुमारे ७० कोटी लोक बीपीवर उपचारही घेत नाहीत, कारण त्यांना ब्लड प्रेशर आहे हे देखील माहीत नाही. रक्तदाबामुळे हार्ट, ब्रेन, किडनी आणि इतर आजारांचा धोका वाढतो. अशा वेळी, प्रत्येक व्यक्तीला त्याचे सामान्य बीपी काय असावे हे माहित असणे आवश्यक आहे (Normal BP range in men and women).

 

महिलांचे बीपी किती असावे
जर महिलांमध्ये बीपी वाढला तर काही चिन्हे दिसतात पण तोपर्यंत बीपी जास्त वाढू शकतो. या लक्षणांमध्ये डोळ्यांजवळ लाल ठिपके, चक्कर येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे यांचा समावेश होतो. २१ ते २५ दरम्यानच्या एका निरोगी स्त्रीचे ब्लड प्रेशर ११५.५ ते ७०.५ असले पाहिजे, तर ३१ ते ३५ वयोगटात तो कमी होऊ लागतो. या वयात, महिलांचे ब्लड प्रेशर ११०.५ आणि ७२.५ च्या खाली असावे.

 

महिला आणि पुरुषांमध्ये वयानुसार योग्य बीपी
वय – पुरुष – महिला
१८-३९ वर्षे – ११९/७० – ११०/६८
४०-५९ वर्षे – १२४/७७ – १२२/७४
६० वर्षांपेक्षा जास्त – १३३/६९ – १३९/६८

पुरुषांचे किती असावे बीपी
स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये बीपीचे मोजमाप थोडे जास्त असते. एका प्रौढ पुरुषामध्ये ३१ ते ३५ वयात ११४.५ ते ७५.५ दरम्यान बीपी असावे. पण ४० वर्षांनंतर बीपीचे मोजमाप थोडेसे वाढते. ६१ ते ६५ वयोगटातील पुरुषांचे बीपी १४३ ते ७६.५ दरम्यान असू शकते.

 

ब्लड प्रेशर कसा कमी करावा
ब्लड प्रेशर वाढले तर हृदयाशी संबंधित अनेक गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जर बीपी वाढला असेल तर लगेच जीवनशैलीकडे लक्ष द्या. दिनचर्येत व्यायाम आणि हेल्दी डाएटचा समावेश करा. सिगारेट, अल्कोहोल, प्रोसेस्ड फूड, जास्त साखर, जास्त मीठ खाणे टाळा. ताण येऊ देऊ नका. डॉक्टरांना नियमित भेट देत राहा आणि सल्ला घेत राहा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Normal BP | How much BP should be according to age and female-male calculation, see chart

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diarrhea in Children | मुलांच्या डायरियाच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या 5 लक्षणे आणि उपचार

Lifestyle | आपण रोखू शकत नाही वाढते वय, परंतु टाळू शकतो, एक्सपर्टकडून जाणून घ्या काय खाल्ल्याने त्वचा राहील तरूण

Pandharpur Crime News | पंढरपूरमध्ये 10 वर्षांच्या मुलाचा छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये आढळला मृतदेह