‘रेप इन इंडिया’वरुन निवडणुक आयोगाची राहुल गांधींना ‘नोटीस’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – झारखंड विधानसभा निवडणुकीत केलेल्या रेप इन इंडिया या वक्तव्यावरुन निवडणुक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन ही नोटीस बजावण्यात आली आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकाचा प्रचार सध्या सुरु आहे.

या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी देशात होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविषयी बोलताना मोदी यांच्या मेक इन इंडियावर टिका केली. त्यात त्यांनी मेक इन इंडिया नव्हे देशात रेप इन इंडिया दिसत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या उद्गारामुळे भाजपाने राहुल गांधी यांना धारेवर धरायची संधी साधली. स्मृति इराणीसह भाजपाच्या महिला खासदारांनी शुक्रवारी संसदेच्या शेवटच्या दिवशी लोकसभा व राज्यसभेत गोंधळ घालून संसद बंद पाडली. त्यामुळे ईशान्य भारतात होत असलेल्या नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात चर्चा होऊ शकली नाही. चर्चा होऊ नये, म्हणून हा गोंधळ घातल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

यावर माफी मागणार नसल्याचे सांगत राहुल गांधी यांनी मोदी यांनीच रेप इन इंडिया हा शब्द वापरला असल्याचे सांगत त्यांचा व्हिडिओ ट्विट केला व मोदी, शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.
त्यानंतर स्मृती इराणी यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/