शहरातील सराईत गुन्हेगार २ वर्षांसाठी तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर, पिंपरी चिंचवड, व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश परिमंडल २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिला आहे.

समीर नैमुद्दीन अन्सारी (२५, बालाजीनगर व घोरपडी पेठ) असे तडीपार करण्यात आलेल्याच सराईताचे नाव आहे.

समीर अन्साही हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घातक शस्त्रे बाळगणे, जखमी करणे, शिवागीळ करून मारहाण करणे, महिलांचा विनयभंग करणे, असे गुन्हे दाखल आहेत. त्याची परिसरात दहशत असल्याने नागरिक त्याच्या विरोधात तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी त्याला पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आय़ुक्तालय व जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून २ वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे

दरम्यान तडीपारीच्या काळात तो शहरात किंवा परिसरात दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.