काँग्रेसचं थंडा करके खाव ! मंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यातही खूपच ‘स्लो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेला सरकार स्थापनेबाबत काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी खूप काळ लागला त्यानंतर मोठ्या शर्थीने काँग्रेसने शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी हिरवा कंदिल दाखवला. तीनही पक्ष सत्तास्थापनेचा दावा करणार एवढ्यात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली आणि सर्वांनाच धक्का बसला. त्यातून सावरून कसेबसे अजित पवारांचे बंड मोडून काढत अखेर तीनही पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र एवढे होऊनही काँगेसचे नेतृत्व सध्या मंत्रिपदाच्या वाटपाबाबत देखील विलंब करत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

सेना भाजप युतीमध्ये निवडणुकीला सामोरे गेले होते त्यानंतर त्यांनीच राज्यात सरकार स्थापन करणे अपेक्षित होते. मात्र दोनीही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्याने शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी केली आणि महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. मात्र या बोलणी दरम्यान काँग्रेसमुळे अनेक निर्णयांना उशीर होत असल्याची भावना अनेकांच्या मनात होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन दोन नेत्यांनी देखील मंत्री पदाची शपत घेतली होती. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १६ आणि काँग्रेसला १३ मंत्रिपद दिली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे हे शिवसेनेत स्पष्ट झाले आहे तर राष्ट्रवादीची यादी अंतिम टप्प्यात आहे.

मात्र काँग्रेसकडून मंत्रिपदाबाबत सध्या अंतिम निर्णय झालेला नाही. या आधी देखील काँग्रेसची निर्णय प्रक्रिया ही खूप संथ असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरेंचे सरकार सहा मंत्र्यांसोबतच सामोरे जाणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.