चंद्रकांत पाटलांना धक्का ! कोल्हापूर भाजप’मुक्त’ ?

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांच्या जिल्ह्यात भाजपची आणखीच पिछेहाट झाल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणूकीत भाजपला जिल्ह्यात मोठे अपयश आले. आता तर काय, भाजपला येथील जिल्हा परिषदवरील सत्ता देखील टिकवता आली नाही. महाविकासआघाडीने भाजपच्या आकांक्षांना सुरुंग लावत कोल्हापूर महानगर पालिका देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली.

महाविकासआघाडीकडून भाजपला सत्तेपासून दूर ढकलण्याचा चंगच बांधला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता संपुष्टात आणली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आता काँग्रेसचे बजरंग पाटील यांची निवड झाली आहे. तर भाजपच्या अरुण इंगवले यांचा दारुण पराभव झाला.

हा पराभव आणि कोल्हापूरातून भाजपची पिछेहाट चंद्रकांत पाटलांच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांच्यात जिल्ह्यात भाजपला मिळालेला धक्का राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या प्रतिमेवर परिणाम करणारा आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा –https://www.facebook.com/policenama/