शनिचे सूर्य मंडळात सर्वात जास्त चंद्र, ‘ज्यूपिटर’ला देखील सोडलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सूर्य मंडळात शनि ग्रहाने चंद्राच्या संख्येच्या बाबतीत बाजी मारली, आता पर्यंतच्या 79 चंद्र असलेला बृहस्पति (ज्यूपिटर) सूर्य मंडळात राजा होता. आता 20 नव्या चंद्रांनी शनिच्या चंद्रांची संख्या 82 झाली. अमेरिकेच्या वॉशिंग्टनच्या कार्नेजी इंस्टीट्यूट फॉर सायन्सच्या खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले की शनि चंद्राच्या संख्येच्या तुलनेत आता सूर्य मंडळाचा राजा बनला आहे.

100 पेक्षा जास्त असू शकते शनिच्या चंद्राची संख्या –
स्कॉट यांनी सांगितले की ज्यूपिटरकडे सूर्य मंडळात सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा चंद्र आहे. ज्यूपिटरचा चंद्र जैनिमेड जवळपास पृथ्वीच्या आकाराचा आहे. शनिच्या नव्या मिळालेल्या चंद्रांचा व्यास जवळपास 5 किमी आहे. शेफर्ड आणि त्यांच्या गटाने टेलीस्कोप लावून शनिचे 20 नवे चंद्र शोधले. शेफर्डने सांगितले की शनिच्या चारही बाजूंना फिरणाऱ्या चंद्रांची संख्या 100 पेक्षा जास्त आहे. ज्याचा शोध अजूनही सुरु आहे.

शेफर्ड यांनी सांगितले की शनिचा सर्वात लहान चंद्राचा व्यास 5 किमी आहे, तर बृहस्पतिच्या सर्वात लहान चंद्राचा व्यास 1.6 किमी आहे. यापेक्षा छोटे चंद्र शोधण्यासाठी अध्यावत टेलिस्कोपची गरज आहे, त्यांनी सांगितले की ज्यूपिटरच्या तुलनेत शनिला चक्कर मारणारे चंद्र शोधणे अवघड आहे, हे जाणून घेणे अवघड आहे की शनिच्या चारही दिशांनी फिरणारे चंद्र किती आहेत. शक्यता आहे की हे छोटे छोटे चंद्र मोठ्या चंद्राच्या तुटण्याने तयार झाले असावे.

17 चंद्र शनिला मारतात उलटी परिक्रमा –
स्कॉटने सांगितले की शनिचे नव्या चंद्रांमधील 17 चंद्र उलट्या दिशेने परिक्रमा मारतात. तीन चंद्र त्या दिशेने परिक्रमा करतात ज्या दिशेने शनि परिक्रमा करतो. हे चंद्र शनिपासून इतके दूर आहेत की त्यांना शनिची परिक्रमा पूर्ण करण्यास दोन ते तीन वर्ष लागतात. या चंद्राच्या अभ्यासावरुन तपासता येईल की हे शनि कोणत्या सूक्ष्म कणांपासून बनला आहे. मागील वर्ष शनिचे 12 नवे चंद्र शोधण्यात आले. आता या नव्या चंद्रांचे नामकरण करण्यात येणार आहे.

Visit : Policenama.com