उज्वल भविष्यासाठी तुम्ही सरकारी स्कीम NPS मध्ये गुंतवलेत पैसे, तर जाणून घ्या नवीन नियमांबाबत अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सरकारी पेंशन स्कीममध्ये (NPS) गुंतवणूक करण्याचा विचार करत असल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पेंशन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणने एनपीएस इंटर्मीडीएरीजला म्यूचुअल फंड किंवा इक्विटी केवायसीचा उपयोग करण्यास अनुमती दिली आहे. स्कीममध्ये पैसे लावलेल्या लोकांना निवृत्तीनंतर महिन्याला 60 हजार रुपये हमखास मिळतील. याशिवाय निवृत्तीनंतर एकत्र फंड मिळेल. ज्याचा एक मोठा भाग खर्च करुन दुसरा मोठा भाग एखाद्या उद्योगात देखील लावता येईल. 60 हजार महिन्याला मिळण्याबरोबरच उद्योगात लावलेले रक्कम तुम्ही आपल्या जोडीदाराच्या चांगल्या आयुष्यासाठी वापरु शकतात.

नियम –
1.  23 सप्टेंबरला जारी करण्यात आलेल्या सूचना पत्रानुसार रेग्युलेटरने एनपीएस प्वाइंट ऑफ प्रेजन्स PoPs) ला एनपीेस रजिस्ट्रेशनसाठी स्टॉक किंवा म्यूचुअल फंड्ससाठी करण्यात आलेल्या केवायसीच उपयोग करण्याची मंजूरी देण्यात आली आहे. आता PoPs संबंधित KRA (KYC Registration Agency) च्या माध्यमातून केवायसी डिटेल मिळवी शकतात.

2. एनपीएस देशातील सर्वात लोकप्रिय पर्यायी बचत योजना आहे. 1 मे 2009 मध्ये ही योजना खासगी क्षेत्र आणि अन ऑर्गनाइज्ड सेक्टरममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली होती.

3. याचा फायदा पाहता एकूण 1.25 कोटी सब्सक्रायबर्समधील 44 लाख खासगी क्षेत्राशी जोडलेले आहे. ही पेंशन सेविंग स्कीम आहे जी भविष्यात आर्थिक सुविधा प्रदान करेल. आता प्रश्न उपस्थित होतो तो 60 हजार रुपये महिन्याला मिळवण्यासाठी कसे प्लॉनिंग करता येईल.

अशी मिळेल 60 हजार रुपयांची पेंशन –
एनपीएस अंतर्गत महिन्याला 10,500 रुपये गुंतवणूक करावी लागेल. 6 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. तुमच्याकडून एकूण गुंतवणूक होईल 31.50 लाख रुपये. 10 टक्के वर्षात परतावा म्हणलं तर एकूण 1.38 कोटी रुपये होतील. त्यातील 65 टक्के रक्कम एन्युटी खरेदी असेल तर एकूण 90 लाख रुपये होतील. एन्युटी रेट 8 टक्के असेल तर 60 वर्षानंतर 60 हजार रुपये पेंशन मिळेल. तसेच 48 लाख रुपयांचा फंड देखील. एन्युटी तुमच्या आणि इंश्योरेंस कंपनीच्यामध्ये एक कांट्रॉक्ट असते. त्यानुसार 40 टक्के रक्कमेची एन्युटी खरेदी करणे आवश्यक असते. ही रक्कम जितकी जास्त पेशन तितकीच जास्त. या योजनेला 18 ते 60 वर्षादरम्याचा वेतनधारक जोडला जाऊ शकतो.

PoPs द्वारे एनपीएस गुंतवणूक करणे झाले महाग –
एका वृत्तनुसार PoPs च्या माध्यमातून एनपीएसमध्ये गुंतवणूक करणे महाग होईल. जर तुम्ही थेट गुंतवणूक करतात तर तुम्हाला ते स्वस्त पडेल. यात तुमच्या प्रत्येक गुंतवणूकीवर 0.25 टक्के शुल्क आकरले जाते. उदा, जर तुम्ही PoPs च्या माध्यमातून एनपीएसमध्ये वर्षाला 50,000 रुपये गुंतवणूक करतात तर तुम्हाला 125 रुपये शुल्क म्हणून द्यावे लागते.

कंप्युटर एज मॅनेजमेंट सर्विसेज आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया देखील एक PoPs आहेत. याशिवाय काही फिनटेक कंपन्या जसे की पेटीएम आणि मायवेवेल्थ ने देखील ऑनलाइन PoP परवाना मिळवलेला आहे. रेग्युलेटरने सध्या म्यूचुअल फंड ग्राहकांना एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्याची सवलत दिली आहे.

एनपीएसमध्ये थेट करता येते गुंतवणूक –
नॅशनल पेंशन स्कीममध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकतात.तुम्ही सेंट्रल रिकॉर्डकिपिंग एजेंसी सारख्या एनएसडीएल किंवा कार्वीच्या माध्यमातून गुंतवणूक करु शकतात. थेट गुंतवणूकीवर कोणतेही शुल्क नाही. शिवाय म्यूचुअल फंडसाठी सध्याच्या केवायसीच्या फायदा तुम्हाला मिळणार नाही.
यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी केवायसी अपेक्षाकृत सोपे आहे आणि तुमच्या आयडी, अॅड्रेस प्रुफ आणि पॅन कार्डनंबरच्या वापरातून तुम्ही केवायसी पूर्ण करु शकतात.

Visit : Policenama.com