सरकारी पेन्शन स्कीम NPS मध्ये मोठया बदलाची तयारी ! पहिल्यांदाच मिळणार Tax मध्ये सूट अन् ‘हा’ फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंथा – सरकारी निवृत्ती वेतन योजना एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS-National Pension System) मध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, NPS मध्ये 1 लाख रूपयांपर्यंत केलेल्या गुंतवणूकीस बजेटमध्ये टॅक्स फ्री केले जाऊ शकते. सरकार एनपीएसला अधिक आकर्षक करण्यासाठी विदड्रॉल आणि कॉर्पोरेट बॉन्डमधील गुंतवणूकीशी संबंधीत नियमात सूट देण्याचा विचार करत आहे.

एनपीएस ही सरकारची मोठी प्रमुख योजना आहे. या योजनेला अधिक आकर्षक करण्यासाठी यावेळेस बजेटमध्ये सध्याच्या 80 सी शिवाय 50 हजार रूपयांची अतिरिक्त गुंतवणूक मर्यादा वाढवून 1 लाख रूपये अथवा 1 लाखापेक्षा अधिक केली जाऊ शकते.

याशिवाय सरकार आणखी तीन मोठ्या बदलांचा विचार करत आहे, ज्यामध्ये सिस्टमेटिक विदड्रॉल प्लान (SWP), जो पीएफआरडीएचा प्रस्ताव आहे, त्यास मंजूरी मिळू शकते.

यामुळे मॅच्युरिटीच्यावेळी एन्युटी काढल्यास फक्त व्याजावरच कर आकारणी होईल. आतापर्यंत एन्युटी आणि व्याजावर कर आकारला जात होता.

तिसरा मोठा बदल हा होऊ शकतो की, सध्या जे केवळ केंद्र सरकारचे 14 टक्के योगदान होते, ते टॅक्स फ्री आहे. परंतु, यास वाढवून आता राज्य सरकार, केंद्र आणि राज्य सरकार जी ऑटोनॉमस बॉडी आहे, त्यांनाही ही सुविधा दिली जाऊ शकते. म्हणजे ते सुद्धा आपले 14 टक्के एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन जे अनिर्वाय आहे ते देतील तर ते टॅक्स फ्री केले जाऊ शकते. सध्या केवळ 10 टक्केच टॅक्स फ्री आहे.

मागील वर्षी जी परवानगी दिली होती, त्यामध्येही आतापर्यंत ही अट होती की, केवळ ए रेटींग कॉर्पोरेटर बॉन्डमध्ये एनपीएस गुंतवणूक करता येईल.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता बीबीबी रेटींगवाले जेवढे कॉर्पोरेट बॉन्ड आहेत, तेथेही एनपीएस गुंतवणूकीची परवानगी मिळू शकते.

कमी व्याज मिळत असल्याने जे एनपीएसच्या मॅच्युरिटीपर्यंत आपला पैसा ठेवू इच्छित नव्हते, अशा लोकांना आता फायदा होणार आहे. या कारणासाठी लोक आपली रक्कम काढून घेत असत, हे थांबवण्यासाठी सरकार हे बदल करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/